कोल्हापूर : विशाळगडाला घाणीतून मुक्त करणार आहात की नाही? तुम्ही करणार नसाल तर मग मला यामध्ये उतरावे लागेल असा इशारा संभाजीराजे छत्रपती ( Former MP Sambhaji Raje ) यांनी दिला. आज स्वतः विशाळगडावर जाऊन त्यांनी इथे झालेल्या अतिक्रमण ( Vishalgad Encroachment ) तसेच तिथल्या परिस्थितीबाबत माहिती घेतली. यानंतर ते बोलत होते. शिवाय पुढच्या काळात आपल्याला यामध्ये लक्ष घालावे लागेल असा सज्जड दमसुद्धा संभाजीराजेंनी दिला. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगड संवर्धन तसेच इथला अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे सातत्याने शिवप्रेमींसह हिंदुत्ववादी संघटनांकडून याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी एक्शन प्लॅन - यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी यांची सुद्धा ही जबाबदारी असल्याचे म्हणत विशाळगडावर इतकी महाभयानक स्थिती निर्माण झालीच कशी? असा सवाल उपस्थित केला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ मिटींगला वेळ देऊन चालणार नाही, तर एक्शन प्लॅन दिला पाहिजे. एव्हढेच काय तर सत्ताधारी, विरोधक दोघांनी येऊन इथे काय परिस्थिती निर्माण झाली आहे, हे पहावे असेही ते म्हणाले.
प्रसाद लाड मूर्ख माणूस - प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबतच्या चुकीचा इतिहास पत्रकार परिषदेत सांगितला याबाबत संभाजीराजे आक्रमक झाले असून प्रसाद लाड हा मूर्ख माणूस आहे. त्याच्यावर आपण काय बोलणार ? मी बोललो तर मी मूर्ख ठरेल असे म्हणत जोरदार टीका ( Sambhaji Raja criticism of Prasad Ladb ) केली. शिवाय आपण स्वतःला शिवरायांचा भक्त मानतो आणि शिवरायांचा जन्म कोकणात झाला असे सांगतो तर यासारखे काही दुर्दैव नाही असेही संभाजीराजे म्हणाले.