ETV Bharat / state

कोल्हापूर : वारणा काठच्या गावांना पुराचा मोठा फटका; अनेकांना सुरक्षितस्थळी हलवले

author img

By

Published : Aug 8, 2019, 8:44 AM IST

Updated : Aug 8, 2019, 8:50 AM IST

वारणा नदीला आलेल्या पुरामुळे खोची, भेंडवडे, निलेवाडी, जुने चावरे, ऐतवडे (पर्वतवाडी), जुने पारगाव, लाटवडे यासह अनेक गावात पाणी शिरले आहे. या गावातील लोकांना, जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

वारणा नदी पूर

कोल्हापूर - शहरासह जिल्हात पडत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हातील सर्वच नद्यांना महापूर आला आहे. वारणा नदीने रौद्ररुप धारण केले असून नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्याची पूरस्थिती ही २००५ च्या पुरापेक्षा गंभीर आहे. यामुळे वारणा काठच्या शेतातील पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वारणेला आलेल्या पुरामुळे खोची, भेंडवडे, निलेवाडी, जुने चावरे, ऐतवडे (पर्वतवाडी), जुने पारगाव, लाटवडे यासह अनेक गावात पाणी शिरले आहे. या गावातील लोकांना, जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बहुतांश शेतजमिन पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान तर झालेच असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पूरपरिस्थिती अजूनही कायम राहिल्यास या भागातील ऊस पिक वगळता इतर पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांनी घर-दार सोडताना घरगुती साहित्य, धान्य घरीच उंच भागावर ठेवली आहेत. पुराचे पाणी आणखीन वाढल्यास घरगुती साहित्यांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. मातीच्या भितीं असलेल्या घरांची पडझड झाल्याचे चित्र आहे.

वारणा नदी पूर
काल दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यात पूरस्थिती बिकट असून, या तीन तालुक्यांतील पूरग्रस्तांसाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक 14 बोटी, ‘एनडीआरएफ’च्या सात, लष्कराच्या चार आणि नेव्हीच्या चार अशा एकूण 29 बोटींसह खासगी बोटींतूनही लोकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-राधानगरी आणि कोल्हापूर-सांगली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे.

Intro:Body:

वारणा काठच्या गावांना पुराचा मोठा फटका; अनेकांना सुरक्षितस्थळी हलवले

Conclusion:
Last Updated : Aug 8, 2019, 8:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.