ETV Bharat / state

Waghave Gram Panchayat : विधवा प्रथा बंद करण्याचा वाघवे ग्रामपंचायतीचा निर्णय - Waghave Gram Panchayat

राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतील हेरवाड ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारा विधवा प्रथा बंदीचा ( Stop Widow Tradition ) निर्णय घेतला. या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत याची राज्यभरातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव नंतर आता पन्हाळा तालुक्यातील वाघवे ग्रामपंचायतीने सुद्धा सामाजिक क्रांतीची मशाल पुढे नेत विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.

Waghave Gram Panchayat
वाघवे ग्रामपंचायतीचा निर्णय
author img

By

Published : Jun 4, 2022, 6:04 PM IST

कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतील हेरवाड ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारा विधवा प्रथा बंदीचा ( Stop Widow Tradition ) निर्णय घेतला. या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत याची राज्यभरातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अनेक ग्रामपंचायती विशेष सभा घेऊन निर्णय घेणार आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव नंतर आता पन्हाळा तालुक्यातील वाघवे ग्रामपंचायतीने ( waghave village stop widow tradition ) सुद्धा सामाजिक क्रांतीची मशाल पुढे नेत विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. ( Waghave Gram Panchayat approves resolution )

Waghave Gram Panchayat
ग्रामपंचायतीचा निर्णय

घरफाळा आणि पाणीपट्टी माफीचा निर्णय - जे कुटुंब या निर्णयाची अंमलबजावणी करेल त्या संबंधित कुटुंबाला एक वर्षासाठी घरफाळा आणि पाणीपट्टी माफीचीही घोषणा वाघवे ग्रामपंचायतीने केली आहे. ग्रामपंचायत सरपंच प्रदीप पाटील यांच्यासह सर्वच सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून झालेल्या विशेष सभेमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी संजय पांडुरंग शेलार हे सूचक होते तर संजय नामदेव सुतार यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, अशाचप्रकारे यापुढे सुद्धा सर्वच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विधवा स्त्रियांना सन्मान मिळत रहावा अशी अपेक्षा सुद्धा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला होता पहिला निर्णय - कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ( Herwad Gram Panchayat ) ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू असून विधवा महिलांना सन्मान मिळवून देणारा विधवा प्रथा बंदकरण्याचा निर्णय या गावाने घेतला आहे. ही कोल्हापुरातील पहिली ग्रामपंचायत होती.

मानगावनेही घेतला होता निर्णय - हेरवाड पाठोपाठ आता कोल्हापुरातील माणगाव ( Stop widow tradition Mangaon village ) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हेरवाड गावाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत आपण सुद्धा विधवा प्रथा बंद ( Stop widow tradition Herwad village Kolhapur ) करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले होते. इतकेच नाही तर गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात तिला सासरी जाताना भेट म्हणून पैठणी साडी ( Paithani saree gift to girls ) देण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे सर्व परिसरातील गावांनी कौतुक केले होते.

हेही वाचा - Redevelopment of BDD Slum : बिडीडी चाळीला राजकीय नेत्यांची नावे, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

हेही वाचा - Sugar Council 2022 : साखर उद्योगासमोरील अनेक प्रश्नांवर शरद पवारांनी सांगितली त्रिसूत्री; मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन, तर गडकरी म्हणाले...

हेही वाचा - Balasaheb Thorat On Rajya Sabha Election : आमच्याकडे चौथ्या उमेदवाराचा आकडा आहे, विजय होणारच - बाळासाहेब थोरात यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.