ETV Bharat / state

Vishalgad Fort : संततधार पावसामुळे विशाळगडाचा बुरुज ढासळला - विशाळगडाचा बुरुज पावसामुळे ढासळला

विशाळगडावरील लोखंडी पायऱ्याजवळचा बुरुज पावसामुळे ढासळला आहे. शिवप्रेमींनी यासाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती केली नसल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे.

Vishalgad Fort
विशाळगडाचा बुरुज ढासळला
author img

By

Published : Jun 28, 2023, 4:49 PM IST

Updated : Jun 28, 2023, 11:01 PM IST

पहा व्हिडिओ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडाचा बुरुज संततधार पावसामुळे ढासळला आहे. या प्रकरणी पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शिवप्रेमींकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील लोखंडी पायऱ्याजवळचा बुरुज संततधार पावसामुळे ढासळला. पावसाळ्यापूर्वी शिवप्रेमींनी पुरातत्त्व विभागाकडे विशाळगडाची डागडूजी करावी, अशी मागणी केली होती. मात्र पुरातत्त्व विभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने हा बुरुज ढासळला असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जात आहे. आता पुरातत्त्व विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडाचे संवर्धन करण्यासाठी गडाची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

शिवप्रेमीं कडून वारंवार पाठपुरावा : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड यासह अन्य किल्ल्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमींनी पुरातत्व विभागाकडे वारंवार केली. मात्र प्रशासनाने कायमच याकडे दुर्लक्ष केले. गडाच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने दुरुस्तीसाठी अनेक अडथळे निर्माण होता आहेत, असा आरोप कोल्हापुरातील शिवप्रेमी रणजीत आयरेकर यांनी केला. शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन जिल्ह्यातील ऐतिहासिक गडांचे संवर्धन झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विशाळगडावर पशुपक्ष्यांच्या कत्तलीला मनाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडाचे पावित्र राखले जावे यासाठी गडावर होणाऱ्या पशु - पक्षांच्या कत्तली थांबाव्यात अशी मागणी शिवप्रेमींनी केली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार आता गडावर पशु - पक्ष्यांच्या कत्तली करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा :

  1. Shahu Maharajs birth anniversary : राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा गौरव जगापर्यंत पोहोचवला पाहिजे - दीपक केसरकर
  2. Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; पहिल्याच पावसात प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा प्रवाहित
  3. Shiv Shahu Sadbhavana Rally: कोल्हापुरामध्ये आज शिव-शाहू सद्भावना फेरीचे आयोजन; पुरोगामी कोल्हापूरचा वारसा टिकविण्यासाठी प्रयत्न

Last Updated : Jun 28, 2023, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.