कोल्हापूर - परराज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता ( RTPCR Negative test for entry in Kolhapur ) कोरोना चाचणी निगेटिव्ह किंवा दोन डोस पूर्ण असणे बंधनकारक केले आहे. याबाबतचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ( Rahul Rekhawar order on Kolhapur entry ) आदेश मंगळवारी दिले आहेत. प्रत्यक्षात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज दि. 2 डिसेंबर रोजी कर्नाटकात दोन ओमायक्रॉनचे रूग्ण आढळल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अद्याप कोणत्याही प्रकारे चेकपोस्ट उभे करण्यात आले नाही. त्यामुळे तपासणी न होताच कर्नाटकातून सर्वच वाहने महाराष्ट्रात येत आहेत.
हेही वाचा- RTPCR Test : कर्नाटकात आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा
जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश मात्र अंमलबजावणी नाही-
कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मार्गावर चेक पोस्ट ( check post on Kolhapur Karnatak border ) उभ करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, एकही पोलीस किंवा आरोग्य कर्मचारी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तैनात नाहीत. त्यामुळे ( vehicles entry in Kolhapur from Karnatak ) कोणतीही तपासणी न होता सरसकट वाहने महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत.
हेही वाचा- RTPCR Test : कर्नाटकात आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा
कर्नाटक सरकारकडून कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी
दुसरीकडे कर्नाटक सरकारकडून कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. कर्नाटकात प्रवेश हवा ( Entry in Karnataka ) असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह ( RTPCR Report Negative Compulsory ) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची येथील कोगनोळी टोल नाक्याच्या ( Kognoli toll Naka ) अलीकडे कर्नाटक हद्दीत तपासणी केली जात आहे. अनेक प्रवाशांना नवीन नियमावली माहीत नसल्याने कर्नाटक पोलिसांसोबत ( Karnataka Police ) वादावादीचे प्रसंग सुद्धा घडत आहेत. जोपर्यंत शासनाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने कडक अंमलबजावणी सुरू राहणार असून प्रवाशांनी आपल्या आरटीपीसीआर रिपोर्ट जवळ ठेवावा, असे आवाहन सुद्धा कर्नाटक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा- Omicron Variant : महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR चाचणी आवश्यक; कर्नाटक सरकारचा निर्णय
दरम्यान, कोरोना चाचणी किंवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसेल त्यांना कर्नाटकामधून महाराष्ट्रात परत पाठवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अशी कडक अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार, असा नागरिक सवाल करत आहेत.