कोल्हापूर - भाच्याचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मामाची हत्या झाल्याची घटना कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे घडली आहे. जमिनीच्या भूसंपादनात मिळालेल्या रकमेवरून हा वाद घडला असून रघुनाथ पवार याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौघांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी (काल) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे विक्री झालेल्या 1 कोटी 28 लाख रुपये किमतीच्या शेतजमीन वाटणीच्या वादातून मारहाणीचा प्रकार घडला होता. या मारहाणीत रघुनाथ ज्ञानू पवार (वय 70, रा. आवळी) या वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रवीण शुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील (तिघे रा. आवळी पैकी पवारवाडी) व दिलीप शामराव गराडे (रा. पैजारवाडी) या चौघांवर कोडोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - गळ्यावर चाकू ठेवून केली सव्वादहा लाखाची लूट... स्वीगी बॉयचा प्रताप