ETV Bharat / state

रियालिटी चेक - व्हायरल झालेल्या कोल्हापुरातील 'त्या' चिमुकल्याच्या व्हिडिओमागील सत्य - कोल्हापूर जिल्हा लेटेस्ट न्यूज

कोल्हापूरसह राज्यभरात एका चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो मुलगा फायनान्स कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना आपल्या घरातील परिस्थिती बिकट आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे काम नसल्याने आई आणि पप्पा सुद्धा घरात बसून आहेत, असे सांगताना पाहायला मिळत आहे. मात्र या व्हिडिओ मागचं सत्य जाणून घेतले आहे 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने

व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील सत्य
व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील सत्य
author img

By

Published : May 21, 2021, 8:12 PM IST

Updated : May 21, 2021, 10:57 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरसह राज्यभरात एका चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो मुलगा फायनान्स कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना आपल्या घरातील परिस्थिती बिकट आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे काम नसल्याने आई आणि पप्पा सुद्धा घरात बसून आहेत, असे सांगताना पाहायला मिळत आहे. मात्र या व्हिडिओ मागचं सत्य जाणून घेतले आहे 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने

संभाजीनगर परिसरातील 'पृथ्वीराज'चा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या जितेंद्र पाटील यांचा 9 वर्षांचा मुलगा पृथ्वीराज याचा 2 दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पृथ्वीराज घरी आलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपल्या घरची परिस्थिती किती बिकट झाली आहे, हे पटवून देताना पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे हप्ता घेण्यासाठी ते आले होते. मात्र पृथ्वीराज याने तुम्ही लॉकडाऊननंतर या असे त्या कर्मचाऱ्यांना म्हंटले. मुळात पृथ्वीराजला लहान वयात आपल्या परिस्थितीची जाण आहे हे यातून दिसत असले तरी, संबंधित व्हिडिओ केवळ गंमतीने बनवला होता असे पृथ्वीराजच्या आई स्वाती पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हंटले आहे. शिवाय फायनान्स कंपनीकडून आम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास नाहीये, त्यांच्याकडून मिळालेल्या कर्जातूनच पाटील यांनी आपला छोटा व्यवसाय सुरू केला आहे. पृथ्वीराजला सुद्धा आम्ही घरात बसून आहेत याची जाणीव आहे. त्यामुळेच त्याने त्यादिवशी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही लॉकडाऊन नंतरच तुम्हाला बोलवून पैसे देतो असे म्हटल्याचे आई स्वाती पाटील यांनी सांगितले. आम्हाला काहीही त्रास नाही शिवाय मुलगा पृथ्वीराज हा थोडा बोलका असल्याने नेहमीच तो पटकन काहीही बोलून जातो. गल्लीतील अनेकजण त्याचे व्हिडिओ बनवत असतात असेही स्वाती पाटील यांनी म्हंटले.

पृथ्वीराज पाटील याचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ

हॉटेल व्यवसायासाठी घेतले होते कर्ज

चिमुकल्या पृथ्वीराजचे वडील जितेंद्र पाटील हे आपली पत्नी स्वाती पाटील आणि दोन मुलांसह संभाजीनगर येथे राहतात. गतवर्षी त्यांनी आपल्या पत्नी स्वाती पाटील यांच्या छोट्या हॉटेल व्यवसायासाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. लॉकडाऊनमुळे व्यवसाय थांबला असल्याने काही हप्ते थकले आहेत. मात्र आपल्या व्यवसायासाठी कर्ज काढले आहे तर ते दिलेच पाहिजे असे स्वाती पाटील यांनी म्हंटले आहे. शिवाय फायनान्स कंपनीने सुद्धा काही महिन्यांची मुदत वाढवून दिली असून, त्यांच्याकडून सुद्धा कसलाही त्रास नाही असेही त्यांनी म्हंटले आहे. जितेंद्र पाटील सुद्धा इव्हेंटच्या माध्यमातून छोटी मोठी काम घेत असतात. त्यातूनच त्यांच्या संसाराचा गाडा सुरू आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील सत्य

लहान वयात परिस्थितीची जाण

दरम्यान, चेष्टेत बनवलेल्या आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 9 वर्षांच्या पृथ्वीराजला आपल्या घरच्या परिस्थितीची असलेली जाण पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. दंगा मस्ती करण्याच्या या वयात आपले आई- वडील काम नसल्याने घरी बसून आहेत याची जाणीव त्याला आहे. त्यामुळेच त्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपण लॉकडाऊननंतर या, काम सुरू झाल्यावर आम्ही स्वतः बोलवून पैसे देतो असेही म्हंटले आहे. सद्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा - पंजाबच्या मोगामध्ये कोसळलं हवाई दलाचं मिग-२१ विमान; जवान हुतात्मा

Last Updated : May 21, 2021, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.