कोल्हापूर - पुणे-बंगळूर महामार्गावर कोगनोळी टोल नाक्याजवळ गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीररित्या वाहतूक करणारा ट्रक कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला आहे. या कारवाईत ट्रकसह सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ट्रकचालक भीमन्ना यल्लप्पा पुजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा... धक्कादायक - कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात ! आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी
पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, बनावटीची दारू घेऊन हा ट्रक गोव्याहून महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगणोळी टोलनाक्यावर कोल्हापूर हद्दीत सापळा लावला. कोल्हापूर हद्दीत हा ट्रक येताच कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तो ताब्यात घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे हा ट्रक वरून पहिला असता रिकामा दिसत होता. मात्र झाडाझडती घेतल्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये ६ लाख ३७ हजार ९८४ रुपये किमतींची बनावटीचे दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी ट्रकसह सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.