ETV Bharat / state

रेल्वे डब्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रवाशांनी रोखली रेल्वे, कोल्हापुरातील रुकडी येथे आंदोलन

डब्यांची संख्या वाढवण्यासाठी वारंवार प्रवाशांनी मागणी करूनही त्याला रेल्वे प्रशासनाने दाद दिली नसल्याने सोमवारी प्रवासी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

author img

By

Published : Jul 23, 2019, 3:18 PM IST

रेल्वे रोखली

कोल्हापूर- पॅसेंजर रेल्वेचे डबे वाढविण्याच्या मागणीसाठी प्रवाशांनी रुकडी स्थानकात रेल्वे अडवून धरली. सातारा- कोल्हापूर रेल्वे पॅसेंजर कोल्हापूर जिल्ह्यातील रूकडी येथील संतप्त प्रवाशांनी रोखली. पॅसेंजरमध्ये आठच डबे असल्याने गर्दी होत आहे. त्यामुळे 12 डबे करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

प्रवाशांनी रेल्वे रोखली

रेल्वेला आठच डबे असल्याने कोल्हापूरला जाणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांचे हाल होत आहे. प्रवाशांनी अनेकदा मागणी करूनही रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रवासी आक्रमक झाले होते. जवळपास अर्धा तास प्रवाशांनी रेल्वे थांबवली. त्यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपाने जमावाला हटवण्यात आले.

सातारा-कोल्हापूर रेल्वे पॅसेंजरला विद्यार्थी, व्यावसायिक व प्रवासी नोकरदारांची संख्या प्रचंड असते. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी या रेल्वेतून प्रवास करत असतात. डब्यांची संख्या वाढवण्यासाठी वारंवार प्रवाशांनी मागणी करूनही त्याला रेल्वे प्रशासनाने दाद दिली नसल्याने सोमवारी प्रवासी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटी डबे वाढविण्याबाबत ग्वाही दिल्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Intro:अँकर : पॅसेंजर रेल्वेचे डबे वाढविण्याच्या मागणीसाठी रेल्वे अडवल्याची घटना घडली आहे. सातारा- कोल्हापूर पॅसेंजर कोल्हापूर जिल्ह्यातील रूकडीत संतप्त प्रवाशांनी ही रोखली. पॅसेंजर मध्ये आठच डबे असल्याने गर्दी होत होती म्हणून 12 डबे करण्याची प्रवाशांनी केली होती मागणी. आठच डबे असल्याने कोल्हापूरला जाणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांचे हाल होत होते. अनेकदा मागणी करूनही रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रवासी आक्रमक झाले असून जवळपास अर्धा तास प्रवाशांनी ही रेल्वे थांबवली. पोलिसांच्या हस्तक्षेपाने जमावला हटवण्यात आले. सातारा - कोल्हापूर रेल्वे पॅसेंजरला विद्यार्थी, व्यावसायिक व प्रवासी नोकरदारांची संख्या प्रचंड असते. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी या रेल्वेतून प्रवास करत असतात. डब्यांची संख्या वाढवण्यासाठी वारंवार प्रवाशांनी मागणी करूनही त्याला रेल्वे प्रशासनाने दाद दिली नसल्याने आज प्रवाशी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटी डबे वाढविण्याबाबत ग्वाही दिल्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.