कोल्हापूर - राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर ( Tourism Minister Aaditya Thackeray on Kolhapur tour ) आहेत. काल रविवारी दुपारी शिरोळ मधल्या नृसिंहवाडी येथील श्री दत्ताचे दर्शन घेतल्यानंतर रात्री उशिरा ते कोल्हापूरात पोहोचले. कोल्हापूरात येताच त्यांनी रात्री 11 वाजता रंकाळा तलावाला भेट ( Aaditya Thackeray Visit Rankala Lake ) दिली आणि संपूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार राजेश क्षिरसागर आदी उपस्थित होते.
विकास कामांचा घेतला आढावा -
नुकतेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार त्यांनी रात्री उशिरा रंकाळा तलावाच्या विकासासाठी सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला.
-
A late evening unscheduled visit to the Rankala Talao of Kolhapur. We are keen to restore it and revive its glory as a lake, along with creation sustainable green surroundings for the citizens and tourists alike. pic.twitter.com/WoLtWOESut
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A late evening unscheduled visit to the Rankala Talao of Kolhapur. We are keen to restore it and revive its glory as a lake, along with creation sustainable green surroundings for the citizens and tourists alike. pic.twitter.com/WoLtWOESut
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 20, 2022A late evening unscheduled visit to the Rankala Talao of Kolhapur. We are keen to restore it and revive its glory as a lake, along with creation sustainable green surroundings for the citizens and tourists alike. pic.twitter.com/WoLtWOESut
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 20, 2022
'रंकाळाला अधिक सुंदर बनविण्यासाठी कटिबद्ध'
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, दरवर्षी लाखो पर्यटक देशाविदेशातून कोल्हापुरात येत असतात, त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करणे. तसेच, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक प्रकल्पांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. शिवाय याबाबत ट्विट करत त्यांनी कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळाला अधिक सुंदर बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही म्हटले.
हेही वाचा - KCR - Thackeray Meet : सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला