ETV Bharat / state

Tomato Price Controversy: कोल्हापुरात माणुसकीला काळीमा ; भाव वाढल्यामुळे समाजकंटकाकडून टॉमेटोच्या शेतीचे नुकसान

author img

By

Published : Jul 12, 2023, 11:34 AM IST

टोमॅटोला आलेले दर पाहून एका समाजकंटकाने शेतकऱ्याच्या शेतातील टॉमेटो उपटून टाकले आहेत. या शेतकऱ्याचे तब्बल दहा ते बारा लाखाचे नुकसान झाल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. कोल्हापुरातील सांगवडे वाडी येथील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे.

Tomato Price Controversy
टॉमेटोच्या शेतीचे नुकसान
अज्ञात व्यक्तीने केले टॉमेटोच्या शेतीचे नुकसान

कोल्हापूर : टॉमेटोचे भाव वाढल्याने टॉमेटोची चोरी झाल्याची घटना घडल्याचे आपण ऐकले होते. आता कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ऊन, वारा, पाऊस यासोबत नेहमी झगडत रात्र आणि दिवस न पाहता शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे अडीच एकर शेतातील पीक अज्ञात व्यक्तीने उपटून टाकले. रात्रीचा दिवस करून वाढवलेले टोमॅटो, कारले, मिरचीची सर्व रोपे उपटून टाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आप्पासाहेब दिनकर चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री अज्ञात समाजकंटकाने हे कृत्य केले आहे. शेतकऱ्याचे जवळपास 10 ते 12 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे.

मोठे आर्थिक नुकसान : लांबलेला पाऊस, पाण्याची कमतरता यातून मार्ग काढत सांगवडेवाडी येथील चव्हाण कुटुंबाने सुमारे अडीच एकर क्षेत्रात टोमॅटो, कारले व मिरचीची लागवड केली होती. तर संजय खोत यांनी वरणा पिकाची लागवड केली होती. वेळेत पाऊस न पडल्याने प्रसंगी भांड्यातून पाणी घालून हे पीक वाढवले होते. चव्हाण यांचे सुमारे १५ जणांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. मात्र या शेतकऱ्यानी जीवापाड जपलेले हे पीक रात्री अज्ञात समाजकंटकांनी उपटून टाकून त्याची नासधूस केली. सध्या टोमॅटोला असलेल्या उच्चांकी दर पाहता यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकाची झालेली ही वाताहत पाहून संपूर्ण चव्हाण कुटुंबावर आकाश कोसळले आहे. याबाबतची माहिती मिळताच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

ही घटना धक्कादायक आणि निषेधार्ह : हादरून गेलेल्या या शेतकरी कुटुंबांना त्यांनी मानसिक आधार दिला. शेताची झालेली ही नासधूस संवेदनशील माणसांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेली ही घटना धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. यावेळी चव्हाण कुटुंब व खोत कुटुंबाला आमदार पाटील यांनी आर्थिक मदतही दिली. यावेळी शीतल खोत, रामदास माने, धनराज खुडे, सुदर्शन खोचगे, रवी खोत, राजेंद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तर सदर समाजकंटकावर कारवाई व्हावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली गेली.

हेही वाचा :

  1. Tomato prices News: किलोभर टोमॅटोने गाठला चिकनचा दर, गृहिणींचे कोसळले बजेट
  2. Tomato Price Controversy: टोमॅटोवरून ग्राहक आणि विक्रेते आपापसात भिडले; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  3. Tomato Price : टोमॅटोने मार्केट खाल्ले; उत्पादन कमी झाल्याने भाव वाढले, जाणून घ्या किंमती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.