कोल्हापूर- जिल्ह्यात आज सकाळी 3 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील 729 रुग्णांपैकी 671 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज प्राप्त झालेल्या 164 अहवालांपैकी 163 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत 1 ने वाढ झाली आहे. शिवाय आज 3 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 50 पॉझिटिव्ह रुग्ण उरले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली. आज प्राप्त 1 पॉझिटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
आजपर्यंत तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:
आजरा- 76, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 85, गगनबावडा- 6, हातकणंगले- 11, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 67, शाहुवाडी- 180, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 721 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 729 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 729 रूग्णांपैकी 671 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारासाठी दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 50 इतकी आहे.