कोल्हापूर- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी सकाळी 10 पासून रात्री 8 पर्यंत 35 नवे रुग्ण वाढले आहेत. 25 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची संख्या 1174 वर पोहोचली आहे. त्यातील 835 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 315 झाली आहे.
शनिवारी वाढलेल्या 35 रुग्णांमध्ये सर्वाधिक 8 रुग्ण करवीर तालुक्यातील आहेत. त्या पाठोपाठ चंदगडमधील 7 आणि कोल्हापूर शहरातील 6 रुग्ण आहेत.
शनिवार पर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 95
भुदरगड- 79
चंदगड- 144
गडहिंग्लज- 125
गगनबावडा- 7
हातकणंगले- 25
कागल- 59
करवीर- 58
पन्हाळा- 42
राधानगरी- 74
शाहूवाडी- 191
शिरोळ- 21
नगरपरिषद क्षेत्र- 141
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-87
असे एकूण 1148
इतर जिल्हा व राज्यातील 26 असे मिळून एकूण 1174 रुग्णांची संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 1174 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 835 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 24 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 315 इतकी आहे.