ETV Bharat / state

दोन महिने उशिरा आलेल्या डेल्टा प्लसच्या अहवालाने कोल्हापूरकरांची चिंता वाढली - kolhapur corona

कोल्हापुरात प्रथमच डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण सापडला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांची चाचणी मे महिन्यात करण्यात आली होती. त्याचा अहवाल तब्बल दोन महिन्याने आल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाल्याने योग्य खबरदारी घेतली आहे.

कोल्हापूरकरांची चिंता वाढली
कोल्हापूरकरांची चिंता वाढली
author img

By

Published : Aug 10, 2021, 10:17 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरात प्रथमच डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण सापडला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांची चाचणी मे महिन्यात करण्यात आली होती. त्याचा अहवाल तब्बल दोन महिन्याने आल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाल्याने योग्य खबरदारी घेतली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या गोंधळामुळे कोल्हापुरात भीतीचे वातावरण आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत अनेक चाचण्या झाल्या असून त्याचे अहवाल अद्याप प्राप्त नसल्याची माहिती समोर येत आहे. अहवाल उशिरा येत असल्याने सर्वसामान्य जनतेला ही बाब जीवघेणी ठरु शकते.

दोन महिने उशिरा आलेल्या डेल्टा प्लसच्या अहवालाने कोल्हापूरकरांची चिंता वाढली

कोल्हापूर शहरातील उपनगरातील एक महिला डेल्टा प्लसने बाधित असल्याचा अहवाल रविवारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे कोल्हापुरात प्रथमच डेल्टाचा रूग्ण सापडल्याने संबंधित आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पवार, डॉ. रमेश जाधव आणि डॉ. अमोल माने यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित महिलांच्या घरी जाऊन पाहणी केली. दरम्यान महिलेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या अन्य नातेवाईकांची तपासणी केली. या सर्व बाबीत संबंधित महिला पूर्णपणे सुरक्षित आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचे तपासणी 28 मे रोजी केली होती. त्याचा स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवला होता. तब्बल दोन महिने उशिराने याचा अहवाल कोल्हापूर महानगर पालिकेला प्राप्त झाले आहेत. या अहवालात संबंधित महिला डेल्टा प्लसने बाधित असल्याचे सांगण्यात आले आहे.

महानगरपालिका सतर्क आणि खबरदारी

संबंधित अहवाल महानगरपालिकेला प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलेले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. दिलेल्या नियमांचे पालन करावे. लक्षण आढळून आल्यास तात्काळ उपचार घ्यावेत अशा सूचना महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.