ETV Bharat / state

मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा असते माया; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल गहिवरून

मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा एकमेकांप्रती माया असते याची प्रचिती आज कोल्हापूरमधील एका घटनेमुळे आली. एका जखमी वासराला टेम्पोमध्ये घालून उपचारासाठी घेऊन जाताना त्या वासराची माय त्या टेम्पोमागे धावत आली. या घटनेमुळे आई ही शेवटी आईच असते याचा प्रत्यय अनेकांना आला.

author img

By

Published : Jul 13, 2019, 9:30 PM IST

Updated : Jul 13, 2019, 10:08 PM IST

मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा असते माया

कोल्हापूर - मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा एकमेकांप्रती किती प्रेम आणि भावना असतात याची प्रचिती आज कोल्हापूरमधील एका घटनेमुळे आली. एका जखमी वासराला टेम्पोमध्ये घालून उपचारासाठी घेऊन जाताना त्या वासराची माय त्या टेम्पोमागे धावत आली. या घटनेमुळे आई ही शेवटी आईच असते याचा प्रत्यय अनेकांना आला आहे.

मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा असते माया, पाहा व्हिडिओ

आज दुपारी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात एका गाईच्या वासराला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे ते वासरू जखमी झाले होते. वासरू जखमी अवस्थेतच लक्ष्मीपुरी परिसरात एका रस्त्यावर पडून होते. याची माहिती येथील पंजारपोळ संस्थेला मिळाली. माहिती मिळताच संस्थेचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले आणि जखमी गाईच्या वासराला एका टेम्पोमध्ये घालून संस्थेत उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

या वासराला घेऊन जात असताना या कर्मचाऱ्यांना एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. या जखमी वासराची आई चक्क या टेम्पोमागे धावत येत असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. थोड्या अंतरानंतर ही गाय पाठलाग सोडेल असे या कर्मचाऱ्यांना वाटले. पण गाईने टेम्पोचा पाठलाग सोडला नाही. लक्ष्मीपुरी ते पंजारपोळपर्यंत या वासराची माय टेम्पोमागे धावत आली. हा प्रसंग पाहून संस्थेच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा गहिवरून आले. दरम्यान, जनावरांमध्येसुद्धा एकमेकांप्रती असलेली माया या घटनेतून समोर आली आहे.

Intro:अँकर : ही अशी दृश्ये आहेत ज्यामुळे मुक्या प्राण्यांमध्ये सुद्धा एकमेकांप्रती किती प्रेम आणि भावना असतात याची प्रचिती येते. ज्या टेम्पोमागे ही गाय धावताना आपल्याला दिसते ही गाय त्या टेम्पोमध्ये जखमी अवस्थेत असलेल्या आपल्या वासरासाठी धावत आहे. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर एका सामाजिक संस्थेने या वासराला उपचारासाठी आपल्या संस्थेत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि या वासराला टेम्पोमधून घेऊन जाताना व्याकुळ झालेली तिची माय या टेम्पोमागेच धावत जात असल्याचे आज पाहायला मिळाले. जनावरांमध्येही एकमेकांप्रती असलेले प्रेम आणि माया यानंतर सर्वांना पाहायला मिळाली. Body:व्हीओ : आज दुपारी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात एका गाईच्या वासराला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. हे वासरू जखमी अवस्थेतच लक्ष्मीपुरी परिसरात एका रस्त्यावर पडून होते. याची माहिती येथील पंजारपोळ संस्थेला मिळली. माहिती मिळताच संस्थेचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. या जखमी गाईच्या वासराला एका टेम्पोमध्ये घालून संस्थेत उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या वासराला घेऊन जात असताना या कर्मचाऱ्यांना एक अद्भुत चमत्कार पहायला मिळाला. या जखमी वासराची आई चक्क या टेम्पोमागे धावत येत असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. थोड्या अंतरानंतर ही गाय पाठलाग सोडेल असेल या कर्मचाऱ्यांना वाटले पण गाईने टेम्पोचा पाठलाग सोडला नाही. लक्ष्मीपुरी ते पंजारपोळ संस्था या वासराची माय टेम्पोमागे धावत आली. हा प्रसंग पाहून या कर्मचाऱ्यांना सुद्धा गहिवरून आले. जनावरांमध्ये सुद्धा एकमेकांप्रती असलेली माया या घटनेतून समोर आली आहे. Conclusion:.
Last Updated : Jul 13, 2019, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.