ETV Bharat / state

KCR On Kolhapur Visit : केसीआर यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; दौऱ्याचे जिल्ह्यावर उमटणार परिणाम - माजी आमदार दिवंगत भारत भालके

तेलंगाणा राज्यामध्ये सलग दोनवेळा सत्ता काबीज केल्यानंतर तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. ते महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज कोल्हापुरात करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले.

KCR On Kolhapur Visit
के चंद्रशेखरराव यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
author img

By

Published : Aug 1, 2023, 7:44 PM IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर आहेत. राव यांनी आज करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत तेलंगाणा मंत्रिमंडळातील सहकारी आणि खासदार, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्याचे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम उमटणार आहेत.

महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू : भारत राष्ट्र समितीकडून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तेलंगणामध्ये राव मंत्रिमंडळाने घेतलेल्या अनेक लोकोपयोगी निर्णयांचे मोठे बॅनर लावण्यात आले होते. तेलंगाणात दोन टर्म सत्ता राखण्यात यशस्वी झालेले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील सहा महिन्यांमध्ये (नोव्हेंबर-डिसेंबर) तेलंगाणामध्ये होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आणि पाठोपाठ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राव यांनी पक्षाच्या विस्ताराचे धोरण आखले आहे.

सोलापुरातही शक्ती प्रदर्शन : के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर आपले लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह आषाढी वारीनिमित्त ते सोलापुरातही शक्तीप्रदर्शन करण्यात यशस्वी ठरले होते. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भागीरथ भालके यांच्या पक्षात सहभागी होण्याने, सोलापूर पूर्व भागात पक्ष मजबूत करण्यासाठी राव यांना युवा चेहरा मिळाला आहे. आता साखरपट्टा अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव चाचपणी करत आहेत. त्याचीच पूर्वतयारी म्हणून आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा दौरा राव यांनी केला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी फिल्डिंग : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी निगडित राजकारण मोठ्या प्रमाणात चालते. महाराष्ट्रात अबकी बार किसान सरकार अशी घोषणा करून शेतकरी नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला थोडेफार यश मिळाले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारत राष्ट्र समितीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना आपल्यासोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्रात पक्ष बळकट करण्यासाठी, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजूनही माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

गुलाबी ध्वज फडकवण्यासाठी हवा तगडा नेता : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण मुख्यतः सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. कोल्हापुरातील सहकार चळवळीतून तयार झालेले नेते आता काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पाय घट्ट करण्यासाठी भारत राष्ट्र समितीला तगड्या नेत्याची गरज आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय नेता के चंद्रशेखर राव यांच्यासोबत आल्यास जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यावर पकड असणाऱ्या नेत्यांची चाचपणी केली जात आहे. मात्र आज झालेल्या मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याचे दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर पाहायला मिळतील यात शंका नाही.

हेही वाचा -

  1. KCR Pandharpur Visit: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव देशाचे नेतृत्व करू शकतात- केसीआर नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
  2. BSR : 'या' कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदार संघात बीआरएसचा उमेदवार ठरला; माजी आमदाराची लेक उतरणार मैदानात
  3. KCR in Solapur : मुख्यमंत्री केसीआर यांची सोलापुरात रॉयल एन्ट्री; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.