ETV Bharat / state

स्वाभिमानीची सोमवारी ऑनलाइन ऊस परिषद; राजू शेट्टींच्या मागणीकडे राज्याचे लक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी परिषदेत काय मागणी करतात? याकडे सर्वांचे लक्ष असते. यावर्षीही परिषदेत नेमकी काय मागणी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 14 टक्के तोडणीचा खर्च कारखानदारांनीच उचलला पाहिजे, अशी भूमिका असणार आहे.

online sugar cane conference
ऊस परिषद
author img

By

Published : Nov 1, 2020, 10:01 PM IST

Updated : Nov 2, 2020, 2:40 AM IST

कोल्हापूर - गेल्या 18 वर्षांपासून सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने 19 वी ऊस परिषद घ्यावी लागत आहे. सोमवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद पार पडणार आहे.

दरवर्षी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी परिषदेत काय मागणी करतात? याकडे सर्वांचे लक्ष असते. यावर्षीही परिषदेत नेमकी काय मागणी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 14 टक्के तोडणीचा खर्च कारखानदारांनीच उचलला पाहिजे, अशी भूमिका असणार आहे. ऊस परिषदेपूर्वीच शनिवारी कारखानदार आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. मात्र, यामध्ये कारखानदारांनी केवळ एकरकमी एफआरपी देण्याबाबत मान्य केले आहे आणि स्वाभिमानीच्या इतर मागण्यांना स्पष्टपणे नकार दर्शवला आहे. त्यामुळे त्याच मागण्या उद्याच्या परिषदेत मांडण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबतची पुढील दिशा सुद्धा जाहीर केली जाणार आहे.

हेही वाचा - एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात.. धावत्या कारचा फुटला टायर

तर दरवर्षीप्रमाणे यंदा जरी भव्य पटांगणावर ही ऊस परिषद होत नसली तरी ऑनलाइन पद्धतीने ही परिषद पार पडणार आहे. त्यासाठी स्वाभिमानीने जोरदार तयारी केली आहे. स्वतः राजू शेट्टी यांनी रविवारी परिषदेच्या ठिकाणाची पाहणी केली. दरम्यान, माझ्या हृदयाच्या ठोक्यांची अनियमितता पाहून डॉक्टरांनी मला थेट अतिदक्षता विभागात भरती केले. त्यामुळे यावर्षी होणारी ऊस परिषद पुढे ढकलावी, असे अनेक कार्यकर्त्यांचे मत होते. मात्र, स्वतःमुळे ऊस परिषदेची ठरलेली तारीख पुढे जाऊ नये, यासाठी डॉक्टरांना विनंती करुन ऊस परिषदेला हजर राहण्याची परवानगी घेतलेली असल्याचे शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी संघटनेचा इशारा -

जोपर्यंत ऊस परिषदेत एफआरपी ठरत नाही, तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही. अन्यथा, गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत ऊसदर ठरवल्याशिवाय कोणताही कारखाना सुरू होऊ देऊ नका, याची जबाबदारी तुम्ही घ्यावी,' असे आवाहन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केले.

Last Updated : Nov 2, 2020, 2:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.