कोल्हापूर : एकनाथ शिंदे निर्णायक पदावर नाहीत ते देवेंद्र फडणवीस यांच्या रिमोटची बाहुली ( CM Shinde Remote Control Doll ) आहेत. त्यांनी रिमोट चालू केला की ते बोलतात, बंद केल की ते थांबतात. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत. असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत ते आज कोल्हापुरातील कुरुंदवाड येथे बोलत होते.
महाप्रबोधन यात्रा कोल्हापुरात : यावेळी त्यांनी बंडखोरांवर कडाडून हल्ला चढवला शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा आज कोल्हापुरात ( Mahaprabodhan Yatra In Kolhapur ) आली. सुषमा अंधारे यांनी आपल्या रोखठोक शैलीत कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोरांचा समाचार ( Sushma Andhare criticize Rebels ) घेतला. सुषमा अंधारे कुरुंदवाडमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाषणाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. कोरोनाकाळात भाजपने कशा थाळ्या वाजवायला लावल्या हे दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओतून केला.
भाजपने द्वेषमुलक राजकारण सुरु केले : भाजपने द्वेषमुलक राजकारण सुरु केलं ( BJP Hate Politics ) आहे. देवेंद्र फडणवीस द्वेषमुलक राजकारण थांबलं पाहिजे म्हणतात, पण करत काहीच नाहीत. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांसारखी अमराठी माणसं महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. भाजपचा मनुवादी संस्कृती महिलांना तुच्छ लेखत आहे. कुलदीप सेंगलसारख्यांना वाचवणारी हीच होती. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचे सांगतात, पण हाथरसमध्ये तरुणीचे रात्रीत अंत्यसंस्कार केले हे कोणते हिंदुत्व सांगतात? अशी विचारणा त्यांनी केली तर सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला. राहुल शेवाळे यांचेही व्हिडिओ व्हायरल झाले. नारायण राणे यांची मुले मातोश्रीबद्दल बोलतात, पण कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली नाही. गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील, बिल्किस बानो असेल यांच्यावरून महिलांना किती तुच्छतेने पाहतात ते दिसते
आईने गद्दारी केल्यानंतर यांनीही केली : जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, उल्हासदादा पाटील तुम्ही आमदार होणार आहेत. सुजित मिणचेकरही त्यांच्या मांडीला मांडी लावून सभागृहात असतील. धैर्यशील माने तुम्हाला माजी खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आईने गद्दारी केल्यानंतर यांनीही केली. तुमचा गेम केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत. यड्रावकर यांचेही डिपाॅझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. गावागावात आम्ही फिरणार आहोत. बाळासाहेबांचे कोणते विचार तुम्ही घेऊन चालला आहात? अशी विचारणा त्यांनी शिंदे गटाला केली.