ETV Bharat / state

मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना योग्य, माजी आमदार हाळवणकर वक्तव्यावर ठाम

भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Suresh Halvankar
माजी आमदार हाळवणकर
author img

By

Published : Jan 15, 2020, 5:19 PM IST

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज, अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे वादग्रस्त विधान इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले होते. त्यावर हाळवणकर यांनी या पुस्तकाच्या समर्थनाबाबत ठाम असल्याचे सांगितले आहे.

भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आहे.

सुरेश हाळवणकर, माजी आमदार

हेही वाचा - मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणे गैर नाही, भाजपच्या माजी आमदाराने तोडले अक्कलेचे तारे

एकीकडे भाजपचे अनेक नेते या पुस्तकाची जबाबदारी झटकत असताना सुरेश हाळवणकर मात्र समर्थनावर ठाम आहेत. गोयल यांच्या पुस्तकाचे समर्थन करणारच शिवाय नरेंद्र मोदींना आज के शिवाजी म्हणणे हे योग्यच असल्याचे म्हणत 'मोदींची तुलना शिवाजी महाराजांच्या बरोबर केली तर वाईट वाटायचं कारण नाही' असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. शिवाय नेटकरी हाळवणकर यांचा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.

असे असताना हाळवणकर आपल्या समर्थनावर ठाम असल्याने ते आता आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, समर्थनावर ठाम असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान हे वाक्य अनावधानाने बोललो. मला शिवाजी महाराजांचा नाही, तर मोदींचा सन्मान म्हणायचे होते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.

हेही वाचा - शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचे श्राद्ध ; मराठी साहित्यिकांवरील बंदीचा केला निषेध

Intro:अँकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे वादग्रस्त विधान इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी काल केले होते. त्यानंतर त्यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे समर्थन करणारच असे पुन्हा एकदा म्हंटले आहे. एककिडे भाजपचे अनेक नेते जबाबदारी झटकत असताना सुरेश हाळवणकर मात्र समर्थनावर ठाम आहेत. गोयल यांच्या पुस्तकाचे समर्थन करणारच शिवाय नरेंद्र मोदींना आज के शिवाजी म्हणणे हे योग्यच असल्याचे म्हणत 'मोदींची तुलना शिवाजी महाराजांच्या बरोबर केली तर वाईट वाटायचं कारण नाही' असेही त्यांनी म्हंटल आहे. त्यांनी काल केलेल्या विधानांनातर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. शिवाय नेटकरी हाळवणकर यांचा निषेध सुद्धा व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. असे असताना हाळवणकर आपल्या समर्थनावर ठाम असल्याने ते आता आणखीनच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, समर्थनावर ठाम असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान हे वाक्य अनावधानाने बोललो असून मला शिवाजी महाराजांचा नाही, तर मोदींचा सन्मान म्हणायचे होते असे स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.

बाईट :सुरेश हाळवणकर, माजी आमदार भाजप

(बाईट्स ना नावं द्या)Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.