ETV Bharat / state

कोरोनाविरुद्धच्या लढाईसोबतच ऊसतोड कामगारांची जगण्यासाठीही लढाई - उसतोडणी कामगार

गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने सर्व काही अस्ताव्यस्त करून टाकले. यामध्ये जवळपास शंभर झोपड्या पडल्या, त्यात एक महिला जखमी सुद्धा झाली. दररोजच असे पावसाचे वातावरण होत आहे. मग आम्ही राहायचं कुठं असा सवाल करत घाबरलेल्या मजुरांनी आम्हाला घरी सोडा, अशी मागणी केलीय.

कोरोना विरुद्धच्या लढाईसोबतच ऊसतोड कामगारांची जगण्यासाठीही लढाई..

author img

By

Published : Apr 17, 2020, 8:36 PM IST

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यात गुरूवारी रात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसाने ऊसतोड मजुरांची अक्षरशः दैना उडाली. कारखाना परिसरात राहणाऱ्या मजुरांच्या यामध्ये शंभरहुन अधिक झोपड्या जमीनदोस्त झाल्या. उरले सुरले धान्य भिजले, अन्नात पाणी साचले. अंथरून पांघरून भिजले. या हलाखीच्या परिस्थितीमुळे या कामगारांनी आता आम्हाला गावाकडे सोडा अशी मागणी केली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईसोबतच ऊसतोड कामगारांची जगण्यासाठीही लढाई

येथील दत्त कारखान्याच्या परिसरात सुमारे 2 हजार ऊसतोड मजूरांचे वास्तव्य आहे. कारखान्याने सर्व प्रकारची सोय, सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने सर्व काही अस्ताव्यस्त करून टाकले. यामध्ये जवळपास शंभर झोपड्या पडल्या, त्यात एक महिला जखमी सुद्धा झाली. दररोजच असे पावसाचे वातावरण होत आहे. मग आम्ही राहायचं कुठं असा सवाल करत घाबरलेल्या मजुरांनी आम्हाला घरी सोडा, अशी मागणी केली.

एकीकडे देश कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. दुसरीकडे मात्र असे शेकडो मजूर कामगार कोरोनासोबतच जगण्याची सुद्धा एक लढाई लढत आहे. त्यामुळे आम्हाला आता घरी सोडा एव्हडीच एक मागणी ते सर्व करत आहेत.

राज्य सरकारने काढले पत्रक-

या घटनेची दखल घेत राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यात विखुरलेल्या ऊसतोड मजुरांना टप्प्याटप्प्याने स्वगृही आणण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले होते. मजुरांची संख्या, त्यांची आरोग्य तपासणी, गावकऱ्यांची सुरक्षा याचा विचार करून राज्य शासनाने शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार या ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.