ETV Bharat / state

अंकली-उदगाव नाक्याजवळ पोलीसांकडून बाहेरून येणाऱ्यांची काटेकोर तपासणी - kolhapur corona

जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहन धारकाची वैद्यकीय तसेच प्रवेश पत्राची तपासणी करण्यात येत आहे.

कोल्हापूर लॉकडाऊन
अंकली-उदगाव नाक्याजवळ पोलीसांकडून बाहेरून येणाऱ्यांची काटेकोर तपासणी
author img

By

Published : May 7, 2020, 12:32 PM IST

Updated : Dec 14, 2022, 12:39 PM IST

कोल्हापूर - माल वाहतूक वाहनांमधून प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता पोलीसांकडून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ज्या महत्वाच्या मार्गांचा वापर होतो, त्या सर्व ठिकाणी येणाऱ्या वाहनांची तपासणी करून जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. एकट्या जयसिंगपूर जवळील अंकली-उदगाव तपासणी नाक्यामधून काल एका दिवसात दोन हजार वाहनांचा प्रवेश झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आज अंकली-उदगाव तपासणी नाक्याला भेट देवून पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, या नाक्यावर दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर चारचाकी आणि मालवाहतूक वाहनांसाठीही स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहन धारकाची वैद्यकीय तसेच प्रवेश पत्राची तपासणी करण्यात येत आहे. मालवाहतूक वाहनांवर स्टिकर चिकटवण्यात येत आहे. थर्मल स्कॅनरद्वारेही तपासणी होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या 61 रस्त्यांपैकी 19 मार्गावर तपासणी नाके ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी वैद्यकीय पथकेही ठेवण्यात आली आहेत. दररोज पोलीस आणि वैद्यकीय पथक यांच्याकडून जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी करण्यात येते. विशेषत: मालवाहतूक वाहनातून प्रवासी वाहतूक होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. काल एका दिवसात या नाक्यामधून सुमारे दोन वाहनांचा प्रवेश झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 19 तपासणी नाक्यांमधून सुमारे 8 हजार वाहने दररोज येत आहेत. यासर्वांची नोंद ठेवण्यात येत आहे.

परवाना घेवून येणाऱ्या व्यक्तींसाठी तीन प्रतीत स्टिकर बनविण्यात आले आहे. एक प्रत तपासणी पथकाकडे दुसरी प्रत संबंधिताकडे तर तिसरी प्रत रुग्णालयातील पोलीस अधिकाऱ्याकडे दिली जात असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. शिवाय संबंधित व्यक्ती रुग्णालयात तपासणीसाठी गेला की नाही याबाबत क्रॉस चेकिंग सुद्धा केले जात असून संबंधिताला फोनवरुनही नियंत्रण कक्षामधून विचारणा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रवाशांनीही अत्यावश्यक कामासाठी परवाना घेवूनच प्रवास करावा. आपली कोणतीही माहिती लपवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Last Updated : Dec 14, 2022, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.