कोल्हापूर : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवसा एक बोलतात, रात्री अनेकांच्या गाठीभेटी घेतात. त्यामुळे या पक्षांवरील विश्वासार्हता ढासळत चालली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वक्तव्य केले जातात. मात्र, तो बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त फेसबुकवर दिसले, आघाडीच्या सरकार काळात राज्य मागे पडल्याची टीकाही विखे-पाटील यांनी यावेळी केली.
गोकुळ दूध संघाच्या लेखापरीक्षात अनियमितता : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे लेखापरीक्षण सध्या सुरू आहे. या लेखापरीक्षणात अनियमित आढळली असून याबाबत गोकुळ दूध संघाला खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. लेखापरीक्षणाचा अहवाल अजूनही राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही. या गैरप्रकाराबाबत संचालिका शौमिका महाडिक यांनी राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर गोकुळ दूध संघाचे विशेष ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहवालानुसार लेखापरीक्षणाबाबत अनिमित्त आढळल्यास गोकुळ दूध संघावर कारवाई करण्याचे संकेत दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत.
राजू शेट्टी उसाकडून महसुलाकडे वळले : राज्याच्या महसूल विभागात शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पैसे घेऊन बदल्या केल्या जातात, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, महसूल विभागातील या प्रकाराबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा प्रकार दाखवून द्यावा, यावर तात्काळ कारवाई केली जाईल. मात्र, ऊस आंदोलन सोडून राजू शेट्टी महसूल आंदोलनाकडे कसे वळले? असा सवाल ही विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या गैरप्रकाराबाबत विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर गोकुळ दूध संघाचे विशेष ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. विखे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दूध दरवाढीसाठी सरकार सकारात्मक : दूध दरवाढीसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दूध दरवाढीबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्था आणि खासगी दूध उत्पादक संस्थांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. दूध दराबाबत राज्यातील सहकारी संस्था, खासगी दूध उत्पादक संस्था, चारा उत्पादक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत त्यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा - Vikhe Patil On Milk Price Hike : दूध दरवाढीबाबत सरकार सकारात्मक, लवकरच निर्णय घेणार - महसूलमंत्री