ETV Bharat / state

इंटक कामगार संघटनेचे रविवारी कोल्हापुरात राज्यव्यापी अधिवेशन - दिवाकर रावते

रविवारी कोल्हापुरात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे.

महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड
author img

By

Published : Feb 22, 2019, 11:10 AM IST

कोल्हापूर- सध्या कामगारांसमोर सुरक्षेचे, कायद्याचे मोठे आव्हान आहे. त्यांना संरक्षण, लाभ मिळत नाहीत. त्यामुळे कामगार असुरक्षित आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी रविवारी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते.

महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड

शाहू सांस्कृतिक भवन येथे हे अधिवेशन होणार आहे, अशी माहिती छाजेड यांनी दिली. शासनाच्या कामगार धोरणावर बोलताना ते पुढे म्हणाले, मोदी सरकारने कामगार क्षेत्रात 'नीम' नावाची नवीन वर्गवारी तयार केली आहे. या वर्गवारीतून कंत्राटी पद्धतीने भरती केलेले शिकाऊ कामगार वर्षानुवर्षे शिकाऊ कामगार म्हणूनच सेवेत राहणार आहेत. त्यामुळे भांडवलदारांना कमी वेतनात कुशल मनुष्यबळ मिळते. मात्र, कामगारांना कोणतीही सेवा, सुविधा, सुरक्षा नियामानुसार मिळत नाही. उद्योग आणि कामगार दोन्हीही वाचला पाहिजे, अशी इंटकची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. ते म्हणाले, एस.टी. महामंडळाच्या ५०० गाड्या बंद करून ‘शिवशाही’ बसेस रावते यांनी सुरू केल्या. पूर्वी एसटी स्वच्छतेचा खर्च ३२ कोटी रुपये असायचा. पण रावते यांनी काळ्या यादीत नाव असलेल्या ब्रिक्स कंपनीला हे काम ४५० कोटी रुपयांना दिले आहे. शिवशाहीमुळे नक्की कोणाचा फायदा झाला हे रावते यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान देत छाजेड यांनी याचे लाभार्थी रावते हेच असल्याचे म्हटले. यावेळी हिंदूराव पाटील, शामराव कुलकर्णी, चंद्रशेखर पुरंदरे, सुभाष ढेरे, शिवानंद हिरवडे, बंडोपंत वाडकर, आप्पा साळोखे, सुरेश सुर्यवंशी, सुवर्णा जाधव, भाग्यश्री भुर्के उपस्थित होते.

Intro:कोल्हापूर- सध्या कामगारांसमोर सुरक्षेचे, कायद्याचे मोठे आव्हान आहे. त्यांना संरक्षण, लाभ मिळत नाहीत. त्यामुळे कामगार असुरक्षित आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी रविवारी इंटक कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते. येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे हे अधिवेशन होणार आहे. Body:शासनाच्या कामगार धोरणावर छाजेड यांनी टीका केली. ते म्हणाले, मोदी सरकारने कामगार क्षेत्रात 'नीम' नावाची नवीन वर्गवारी तयार केली आहे. या वर्गवारीतून कंत्राटी पद्धतीने भरती केेलेले शिकाऊ कामगार वर्षानुवर्षे शिकाऊ कामगार म्हणूनच सेवेत राहणार आहेत. त्यामुळे भांडवलदारांना कमी वेतनात कुशल मनुष्यबळ मिळते. परंतु कामगारांना कोणतीही सेवा, सुविधा, सुरक्षा नियामानुसार मिळत नाही. उद्योग व कामगार दोन्हीही वाचला पाहिजे अशी इंटकची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर सुद्धा निशाणा साधला ते म्हणाले, एस.टी. महामंडळाच्या ५०० गाड्या बंद करुन ‘शिवशाही’ बसेस परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरु केल्या. पूर्वी एसटी स्वच्छतेचा खर्च ३२ कोटी रुपये असायचा. पण रावते यांनी काळ्या यादीत नाव असलेल्या ब्रिक्स कंपनीला हे काम ४५० कोटी रुपयांना दिले आहे. शिवशाहीमुळे नक्की कोणाचा फायदा झाला हे रावते यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान देत छाजेड यांनी याचे लाभार्थी रावते हेच असल्याचे म्हंटले. यावेळी हिंदूराव पाटील, शामराव कुलकर्णी, चंद्रशेखर पुरंदरे, सुभाष ढेरे, शिवानंद हिरवडे, बंडोपंत वाडकर, आप्पा साळोखे, सुरेश सुर्यवंशी, सुवर्णा जाधव, भाग्यश्री भुर्के उपस्थित होते.

बाईट - जयप्रकाश छाजेड, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, माजी आमदारConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.