ETV Bharat / state

कोल्हापुरातून एसटी मालवाहतूक सुरू, पालकमंत्री सतेज पाटलांच्या हस्ते शुभारंभ - पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते एसटी मालवाहतुकीचे उद्घाटन

आज कोल्हापूर विभागातील एसटीतून मालवाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अशा ३५० मालवाहतूक बस सुरू करण्यात येणार आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ बस वाहतूक सुरू करण्यात येणार आहेत.

goods
मालवाहतूक बसचे उद्घाटन करताना सतेज पाटील
author img

By

Published : Jun 29, 2020, 5:49 PM IST

कोल्हापूर - एसटी म्हणजे विश्वास, हे ५० वर्षे राज्यातील प्रवाशांनी अनुभवले आहे. एसटीवरील विश्वासहर्ता कर्मचाऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. त्यामुळे आज कोल्हापूर विभागातील एसटीतून मालवाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. यात नक्की एसटी महामंडळ यशस्वी होईल, असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. आज कोल्हापूर राज्य परिवहन विभागाच्यावतीने मालवाहतूक एसटी बसची सुरवात करण्यात आली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापुरातून एसटी मालवाहतूक सुरू, पालकमंत्री सतेज पाटलांच्या हस्ते शुभारंभ

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, राज्यात अशा ३५० मालवाहतूक बस सुरू करण्यात येणार आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ बस वाहतूक सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी कामकाज, बालभारती सारख्या कामांना वेग येईल, असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या काळात एसटीने महत्वाची भूमिका बजावली. कोकणातील आंबा वाहतूक व इतर कामासाठी एसटी उपयोगी आली. मालवाहतुकीच्या राज्यात आतापर्यंत १९०० फेऱ्या झाल्या. त्यातून एसटी महामंडळाला दीड कोटी रुपयांचा नफा मिळला. येणाऱ्या काळात मालवाहतूक एसटीला उभारी देईल, असा विश्वास देखील मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे, आगार व्यवस्थापक अजय पाटील, डिटीओ शिवराज जाधव, स्थानक प्रमुख दयानंद पाटील यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.