ETV Bharat / state

Kolhapuri Milk Misal : कोल्हापूरकरांच्या दिवसाची सुरुवात होते खास 'दूध मिसळ'नं; खवय्यांची खेचते गर्दी - चटकदार मिसळीचे स्टॉल

कोल्हापुरातील झणझणीत मिसळ राज्यभरात सुप्रसिद्ध आहे. सध्या कोल्हापुरातील अविनाश काटे यांनी 'दूध मिसळ' सुरु केली आहे. या दूध मिसळला कोल्हापुरातील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Kolhapuri Milk Misal
दूध मिसळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2023, 8:32 AM IST

Kolhapuri Milk Misal : कोल्हापुरातील झणझणीत दूध मिसळ

कोल्हापूर : भावा म्हणून घातलेली आपुलकीची साद अन् माणुसकीच्या राजधानीचं शहर म्हणून मिरवणाऱ्या कोल्हापुरात गल्ली गल्लीत चटकदार मिसळीचे स्टॉल आहेत. खवय्यांसाठी काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक जण करतो. सध्या मात्र कोल्हापूर शहरात अविनाश काटे यांनी बनवलेली दुधाची मिसळ खवय्यांसाठी मेजवानी ठरत आहे. सध्या कोल्हापूरकरांच्या दिवसाची सुरुवात 'दूध मिसळ'नं होत आहे. पाहुयात जगावेगळ्या दूध मिसळचा हा 'स्पेशल रिपोर्ट'.

'दूधमिसळ'ला कोल्हापूरकरांची पसंती : मिसळ म्हणजे कोल्हापूरकरांचा जीव की प्राण. वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ सध्या कोल्हापुरात मिळत आहेत. त्यातीलच एक आहे 'दूध मिसळ'. खरंतर दूध हा घटक कोणत्याही तिखट किंवा खारट पदार्थसोबत मिसळला तर तो पदार्थ खराब होतो. मात्र हे मिसळ बनवताना वापरले जाणारे मसाले आणि बनवण्याची पद्धत यामुळे मिसळची चव बिघडत नाही, तर उलट दुधामुळे या मिसळची चव जिभेवर रेंगाळत राहते. त्यामुळे 'दूध मिसळ'ला कोल्हापूरकरांची चांगलीच पसंती मिळत आहे.

कोरोनानं नोकरी गेल्यानंतर सुरु केलं मिसळ अन् पुलाव सेंटर : कोल्हापुरातील बागल चौकातील काटेज किर्रर मिसळ आणि पुलाव हे मिसळ मिळण्याचं सुप्रसिद्ध ठिकाण आहे. अविनाश काटे आणि त्यांच्या पत्नी हे मिसळ सेंटर चालवतात. खरंतर अविनाश हे हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन 12 वर्षे हॉटेल व्यवसायात कार्यरत होते. मात्र कोरोना कालावधीत त्यांची नोकरी गेली, त्यानंतर 2021 साली त्यांनी हे मिसळ आणि पुलाव सेंटर सुरू केलं.

'दूधमिसळ' बनवण्यासाठी काय लागतात घटक : 'दूध मिसळ' बनवण्यासाठी सुरुवातीला या मिसळचा मसाला बनवून घ्यावा लागतो. हा मसाला ओल्या खोबऱ्याचा कच्चा मसाला, नारळाचं दूध, तेल, जिरे, मोहरी आणि कडीपत्ता, धने पावडर, जिरे पावडर, मीठ, काश्मीरी तिखट आणि कांदा लसूण चटणी आदी घटक लागतात. त्याचबरोबर अविनाश काटे हे त्यांच्या मिसळसाठी त्यांनी खास बनवलेले 28 खड्या मसाल्यांचं मिश्रण वापरतात.

कशी बनते 'दूधमिसळ' : सुरुवातीला ओल्या खोबऱ्याचा मसाला बनवताना त्यामध्ये नारळाचं दूध बनवून हा कच्चा मसाला बनवला जातो. सूर्यफुल तेल घेऊन त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कडीपत्ता टाकून तो कच्चा मसाला थोडा भाजून घेतला जातो. यानंतर त्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, मीठ आणि 28 खड्या मसाल्यांपासून बनवलेला स्पेशल मसाला हे घटक टाकून मंद आचेवर थोडा वेळ मसाला भाजून घेतला जातो. त्यामध्ये काश्मीरी तिखट आणि कांदा लसूण चटणी टाकून थोडा वेळ एकजीव करण्याची प्रक्रिया होते. मिसळीसाठी मटकी शिजवून घेऊन त्याचं पाणी बाजूला काढून घेतलं जाते. त्यामध्ये हा तयार मसाला गरजेप्रमाणं टाकून उकळू दिला जातो. रस उकळू लागल्यावर त्यामध्ये दूध टाकून पुन्हा उकळी दिली जाते. उकळलेला हा रस मिसळसाठी तयार असतो. मिसळ देताना बारीक चिरलेले उकडलेले बटाटे, मटकीची मोड, शेव चिवडा, मिसळचा तयार झालेला रस आणि थोडसं दही टाकून खायला दिलं जाते.

मिसळनं होते कोल्हापूरकरांच्या दिवसाची सुरुवात : कोल्हापूरकरांच्या दिवसाची सुरुवात मिसळच्या नाश्तापासून होत असल्यानं कोल्हापुरात मिसळ खाल्ला नाही, असा माणूस शोधूनही सापडत नाही. मात्र अनेकांना अपचनाचा त्रास होत असल्यानं दुधापासून बनवलेली मिसळ कोल्हापूरकरांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. अवघ्या 40 रुपयात 'दुध मिसळ' उपलब्ध होत असल्यानं मिसळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे.

हेही वाचा -

  1. Raj Thackeray Thane : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतला 'मामलेदार मिसळ'चा आस्वाद
  2. Nashik Misal Dispute : नाशिकमध्ये 'निखारा मिसळ'च्या नावावरून वाद, जाणून घ्या काय आहे प्रकरण...
  3. Bunny Chow Misal : पुण्यात मिळते आफ्रिकन 'बनी चाव मिसळ'; आस्वादासाठी नागरिकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.