ETV Bharat / state

Flood Monitoring, Alert System: महापुर येण्याआधीच मिळणार आता अलर्ट; 'हे' ॲप्लिकेशन देणार माहिती - Flood Monitoring and Alert

मागील काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासन त्यावर विविध उपाय योजनेसाठी प्रयत्न करत असते. याच महापुरामध्ये जेव्हा आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होत असते, तेव्हा महापुराची इथंबूत माहिती असणे गरजेचे असते. हीच इथंबूत माहिती देण्यासाठी कोल्हापुरातील एका सॉफ्टवेअर कंपनीने 'फ्लड मॉनेटरिंग अँड अलर्ट सिस्टीम'चे ॲप्लिकेशन बनवले आहे. हे ॲप्लिकेशन नेमके कोणी बनवले आहे? नेमके काय काम करणार आहे? या संदर्भात सविस्तर जाणून घेवू या.

Flood Monitoring and Alert System application
फ्लड मॉनेटरिंग अँड अलर्ट सिस्टीम
author img

By

Published : Apr 12, 2023, 12:25 PM IST

Updated : Apr 12, 2023, 1:12 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरातील राजारामपुरी येथे असलेली 'वेलोस टेकईनसाईट्स' ही कंपनी कोल्हापुरसह पुणे, दुबई आणि अमेरिकेत सुद्धा काम करत आहे. 2015 पासून ही कंपनी आयटी आणि आयओटी क्षेत्रात काम करत आहे. आजवर त्यांनी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. या कंपनीचे बजाज, टीव्हीएस, महिंद्रा अँड महिंद्रा सह अनेक मोठमोठ्या कंपन्या ग्राहक आहेत. याच कंपनीने कोरोना काळात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला ज्या महापुराला सामोरे जावे लागते, त्या समस्येवर काम करायचे ठरवले. त्यानुसार महापुराचा पूर्व इशारा, संभाव्य पावसानंतर पाण्याची वाढणारी पातळी, त्यामुळे बंद होणारे रस्ते याबाबत आधीच माहिती मिळेल, अशी सिस्टीम त्यांनी बनवली आहे.

फ्लड मॉनेटरिंग अँड अलर्ट सिस्टीम

अत्याधुनिक संकल्पना : सध्या अमेरिकेत ही अत्याधुनिक संकल्पना राबवली जात आहे. भारतात सुद्धा याची सध्या गरज असल्याचे कंपनीचे सीईओ हर्षवर्धन साळुंखे यांनी म्हटले आहे. कोल्हापूरात असलेल्या कंपनीच्या मुख्य शाखेमध्येच अनेक इंजिनीअरनी मिळून ही सिस्टीम साकारली आहे. त्याचे ॲप्लिकेशन बनविण्यात त्यांना यश आले आहे. याच्या अनेक चाचण्या सुद्धा त्यांनी घेऊन ठेवल्या आहे. 80 टक्के अचूकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशासनाकडे सुद्धा याबाबतच्या अनेक पद्धतीने माहिती मिळत आहे. मात्र रिअल टाईम डेटा देणारी ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फ्लड मॉनेटरिंग अँड अलर्ट सिस्टीम : 'वेलोस टेकईनसाईट्स' या कंपनीने बनविलेल्या 'फ्लड मॉनेटरिंग अँड अलर्ट सिस्टीम' मध्ये प्रत्येकाला रिअल टाईम डेटा मिळणार आहे. शिवाय प्रशासनाला एक हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळणार आहे. ज्यामध्ये धरणातून सोडलेले पाणी, त्याचा वेग, होणारा पाऊस, सध्याची पाणी पातळी आणि त्यामुळे किती फूट पाणी वाढेल याची माहिती आधीच मिळू शकणार आहे. एक दोन तास नाही तर तब्बल 12 ते 72 तास आधी आपण याचा अंदाज देऊ शकतो, असेही साळुंखे यांनी म्हटले आहे. ही सिस्टिम एआय, एमएल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सेन्सर आणि आयोटी अर्थात इंटरनेट ऑफथिम्स या संकल्पनेवर आधारित आहे.

रीअल टाईम डेटा मिळणार : यासाठी प्रत्येक बंधाऱ्यावर आयओटी संच लावला जाईल, तेथील पाण्याची सद्याची पातळी आणि वेग रीअल टाईमवर घेतला जाईल. हवामान खात्याकडून प्राप्त इशारे यांची देखील नोंद या सिस्टीममध्ये समाविष्ट केली जाईल. याशिवाय पाटबंधारे विभागाकडील सविस्तर डाटा एकत्र करून एआय, एमएलच्या अल्गोरिदममधून पाण्याची संभाव्य पातळी, पूरस्थितीचा अंदाज लावता येणार आहे. सध्या अशी माहिती प्रशासनाकडून सुद्धा मिळते, त्यामध्ये हमखास अशी आकडेवारी मिळत नाही, मात्र या सिस्टिममुळे रीअल टाईम डेटा मिळणार आहे. ही आकडेवारी अचूक सुद्धा असणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

या प्रोजेक्टसाठी 'यांची' घेतली मदत : या प्रोजेक्टमध्ये कंपनीचे सीईओ हर्षवर्धन साळुंखे यांच्यासह अजिंक्य दीक्षित, शुभम कुलकर्णी, राजवर्धन कुलकर्णी, निखिल नवरे, साक्षी पंडित, मनाली सोनवणे-मोरे, रुचा कोकाटे यांनी परिश्रम घेतले. शिवाय शिवाजी विद्यापीठ, पाटबंधारे विभाग, पिडब्ल्यू विभागातील काही अधिकाऱ्यांचे सुद्धा सहकार्य लाभल्याचे साळुंखे यांनी माहिती दिली. दरम्यान, महापुराबाबत प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतात. सध्या प्रशासनाकडे अनेक गोष्टींची उपलब्धता आहे. मात्र अशा पद्धतीच्या अत्याधुनिक गोष्टींचा सुद्धा वापर करण्यात आला, तर प्रत्येक क्षणाची इथंबूत माहिती प्रत्येकाला आपल्या मोबाईलवर मिळू शकणार आहे. त्यामुळे याचा प्रशासनाने विचार केल्यास प्रशासनासह नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, असेही कंपनीचे सीईओ हर्षवर्धन साळुंखे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Quora Opens AI Chatbot : कोराने एआय चॅटबॉट 'Poe' सार्वजनिक वापरासाठी केले उपलब्ध

Last Updated : Apr 12, 2023, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.