ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : चक्क शेणाच्या चपला, कोल्हापुरी चपलांची आणखी एक नवी ओळख - कोल्हापूर लेटेस्ट न्यूज

कोल्हापुरी चप्पल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तसेच चपलांची निर्यात देखील केली जाते. मात्र, आता याच कोल्हापुरात चक्क गाईच्या शेणापासून चपला बनवल्या आहेत.

kolhapur slippers news  kolhapur dung slippers news  kolhapur dung slippers  kolhapuri slippers  कोल्हापुरी चपला  कोल्हापुरी शेणाच्या चपला  कोल्हापुरी चपला न्यूज  कोल्हापूर लेटेस्ट न्यूज  शेणाच्या चपला बनवणारी कंपनी कोल्हापूर
कोल्हापुरी चपलांची आणखी एक नवी ओळख, शेणाच्या चपला
author img

By

Published : Jul 2, 2020, 1:22 PM IST

Updated : Jul 2, 2020, 6:17 PM IST

कोल्हापूर - आपण यापूर्वी लाकडाच्या, कागदाच्या चप्पलापासून सोन्याच्या चप्पल सुद्धा पाहिल्या असतील. इतकेच नाहीतर, कोल्हापूर म्हटल्यावर चटकन आठवते ती कोल्हापुरी चप्पल. पण, आता यात भर म्हणून चक्क गाईच्या शेणापासून एका कोल्हापूरकराने बनवलीय. विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. या चपला विक्रीसाठी देखील आल्या आहेत. या शेणापासून बनवलेल्या चपला कशा फायदेशीर ठरतात? याबाबत पाहुयात एक विशेष रिपोर्ट...

ईटीव्ही भारत विशेष : चक्क शेणाच्या चपला, कोल्हापुरी चपलांची आणखी एक नवी ओळख

कोल्हापुरातील किरण माळी यांची टोटल ड्रीम सर्व्हिसेस कंपनी आहे. त्याच कंपनीमध्ये ते शेणापासून चपला तयार करतात. त्या चपलेला त्यांनी 'गोमय चरण पादुका', असे नाव दिले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या शेणाचे अनेक फायदे आहेत. शेणापासून बनवलेल्या या चपला पायात घातल्यानंतर अनेक आजारांपासून सुटका मिळते, असा दावा देखील माळी यांनी केला आहे. यामध्ये आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच मानसिक ताण सुद्धा दूर होत असल्याचा दावा त्यांनी केला.

या शेणाच्या चपला पाण्यामध्ये देखील टीकू शकतात. मात्र, शक्य असल्यास पाण्यामध्ये या चपलांचा वापर टाळावा, असे त्यांनी म्हटले आहे. शेणाच्या या चपलांची किंमत ५०० ते ७०० रुपये इतकी आहे. तसेच या चपला लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांसाठी उपलब्ध आहेत. शिवाय त्यांच्या चपलांना प्रचंड मागणी असल्याचे किरण माळी यांनी सांगितले. यापुढे परदेशात सुद्धा या चपला पाठविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

गाय फक्त दूध देते आणि त्यामधून चांगले पैसे मिळतात, या दृष्टीकोणोतून सर्वजण गाईकडे पाहत असतात. गाईने दूध देणे बंद केले, की तिला कत्तलखान्यात विकले जाते. मात्र, याच गाईच्या शेणापासून चपला बनवल्या, तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच गाय शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या गोठ्यात दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Jul 2, 2020, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.