ETV Bharat / state

आजरा येथे अपघातात सिंधुदुर्गचा युवक जागीच ठार - युवकाचा अपघातात मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-निपाणी मार्गावर उत्तूर जवळील वळणावर गाडी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Sindhudurg youth dies in accident at Ajra
आजरा येथे अपघातात सिंधुदुर्गचा युवक जागीच ठार
author img

By

Published : Jan 14, 2021, 3:35 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यातील आजरा-निपाणी मार्गावर उत्तूर जवळील धोकादायक वळणावर गाडी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात रमाकांत कुडाळकर (वय-22, रा-कुंभारवाडी कुडाळ, जि- सिधुदुर्ग) हा युवक जागीच ठार झाला आहे. त्याच्या सोबत असलेला सिद्धेश सुर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी झाला आहे.

Sindhudurg youth dies in accident at Ajra
आजरा येथे अपघातात सिंधुदुर्गचा युवक जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार -

मृत रोहीत कुडाळकर यांच्यासह पाच जण पर्यटनासाठी महाबळेश्वर, लोणावळा येथे गेले होते. पर्यटन करुन परत कुडाळ येथे जात असताना उत्तूरजवळील वळणावर रात्री अडीचच्या सुमारास अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या दगडाला धडकून पलटी झाली, आणि तब्बल शंभर मीटर फरफटत गेली. या अपघातात रोहीत रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोकीला गंभीर दुखापती झाली आणि त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

रोहीत सोबत आणखी 4 जण प्रवास करत होते. मात्र, त्यातल्या जगन्नाथ पेडणेकर यांच्या पोटाला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गाडीतील ओंकार मेघनाथ वालावलकर, (रा. नेरुर), बाबूराव सुभाष परब (रा. नाबरवाडी), रघुनाथ बाबू कुंभार (रा. कुंभारवाडी) हे तिघेजण किरकोळ जखमी आहेत. या सर्वांवर गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मृत रोहित हा कुडाळमध्ये वायफाय कनेक्शनचे काम करतो. तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे परीसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.