कोल्हापूर - पालकमंत्र्यांनी स्वतःचे काम सुधारावे, झाले गेले विसरून कामाला लागावे अन्यथा राजकीय चक्र सुरूच आहे. त्यांना खाली यायला वेळ लागणार नाही. शिवसेनेवर अन्याय होत असताना देखील मी अद्यापही काही बोललो नाही. माझ्यावरील आरोप मी सहन करत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन पालकमंत्र्यांनी २०१४ ची वेळ येऊ देऊ नये, असा टोला देखील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लगावला.
वरिष्ठांची मर्जी आज आम्ही मानायला तयार
पुढे क्षीरसागर म्हणाले, वरिष्ठांची मर्जी आज आम्ही मानायला तयार आहोत, त्यांनी आम्हाला सांगितले, महाविकास आघाडी करा, तर आम्ही करायला तयार आहोत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांचा पराभव झाला. तर 2017 मध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीला शिवसेनेच्या नगरसेवकांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांना मतदान केले. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला धोका देण्याचे काम पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
ज्या वेळी शिवसेनेची गरज भासते त्या वेळी त्यांनी नेहमीच शिवसेनेकडून काहीतरी घेतली आहे. विधानपरिषदेची पायरी सतेज पाटलांना चढायची होती. त्यावेळी शिवसेनेचा पाठिंबा त्यांनी घेतला. शिवसेनेचे बोट धरूनच ते विधानभवनात गेले आहेत, याचा त्यांना त्याचा विसर पडला आहे.
त्यांनी धोका देण्याचे काम केले
पुढे क्षीरसागर म्हणाले, राजकीय परिस्थिती आहे तशी राहत नाही. पाटील हे राष्ट्रवादीला देखील टेकओव्हर करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते देखील सतर्क झाले आहेत. मी बेसावध असताना त्यांनी धोका देण्याचे काम केले. जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. शिवसेनेने कोणा-कोणाला मदत केली. पुढच्या काळात पालकमंत्र्यांनी स्वतःचे काम सुधारावे. झाले गेले विसरून कामाला लागावे अन्यथा राजकीय चक्र सुरूच आहे. त्यांना खाली यायला वेळ लागणार नाही, असा टोला देखील क्षीरसागर यांनी लावला. शिवसेनेवर अन्याय होत असताना देखील मी अद्यापही काय बोललो नाही. माझ्यावरील आरोप मी सहन करत आहे. त्यामुळे काहीही बोलले तर चालेल, असे होणार नाही. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन, २०१४ ची वेळ येऊ देऊ नये, असा टोला देखील क्षीरसागर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लगावला.