ETV Bharat / state

आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी शिवसेनेचा रास्तारोको - आजरा साखर कारखाना न्यूज

आजरा तालुक्यातील गवसे गावात असलेला सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. बँकेने आणि शासनाने लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करून तो सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. शिवसेनेने यासाठी रास्तारोको केला.

Agitation
आंदोलन
author img

By

Published : Oct 20, 2020, 5:20 PM IST

Updated : Oct 20, 2020, 9:55 PM IST

कोल्हापूर - आजरा तालुक्यातील 'आजरा सहकारी साखर कारखाना' सुरू व्हावा, या मागणीसाठी शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. संकेश्वर- सावंतवाडी राज्य मार्ग रोखत हे आंदोलन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर हा कारखाना सुरू करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी शिवसेनेचा रास्तारोको

कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन झाले. यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शेतकऱ्यांनी कष्टाचा पैसा गोळा करत आजारा सहकारी साखर कारखाना उभा केला. मात्र, कोल्हापूर जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी कारखाना ताब्यात घेतला. त्यानंतर बँकेने कारखाना चालवायला देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. एका कंपनीने निविदा भरली होती. मात्र, संबंधित कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने बँकेने ती निविदा रद्द केली. त्यानंतर कारखान्याच्या अध्यक्ष आणि संचालकांनी शासनाकडे थकहमीची मागणी केली. मात्र, ही थकहमी देण्यासाठी बँकेच्या ना हरकत पत्राची गरज आहे. अद्याप बँकेने हे पत्र दिलेले नाही.

विजयादशमीपासून गळीत हंगाम सुरू होणार आहे. त्याअगोदर जर जिल्हा बँकेने शासनाला ना हरकत पत्र दिले तर कारखाना सुरू होऊ शकतो. त्यामुळे याबाबत बँकेने आणि शासनाने लवकरात कार्यवाही करावी व शेतकाऱ्यांच्या हक्काचा कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी केली.

Last Updated : Oct 20, 2020, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.