कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चिघळला आहे. सीमावादावरून कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक भागात आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. एडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
याबरोबरच सेनेच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानकापासून निषेध रॅली काढली. या रॅलीमध्ये खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सतेज पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कन्नड सिनेमा पाडला बंद -
दरम्यान, युवासैनिकांनी अप्सरा थिएटर येथे सुरू असलेला कन्नड सिनेमा बंद पाडला. तर कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील काही ठिकाणी दुकानदारांच्या कन्नड भाषेमधील लिहिलेल्या पाट्यांना काळे फासले.
हेही वाचा - ...तर महाराष्ट्रातील कानडी लोकांचे कपडे काढून हाकलू