ETV Bharat / state

Sharad Pawar On Hasan Mushrif : ईडी कारवाईत पत्नीनं धाडस दाखवलं, मात्र...; शरद पवार मुश्रीफांवर बरसले - नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा

सरकारनं काही दिवसांपूर्वी राज्यातील काही नेत्यांना ईडीच्या नोटिसांचा दम दिला. याला काहींनी न घाबरता विरोध केला, तर काहींनी आपली भूमिका बदलली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना लगावला. ते शुक्रवारी कोल्हापुरातील जाहीर सभेत बोलत होते. मुश्रीफ यांच्या पत्नीनं ईडी कारवाईचा सामना केला. पण घाबरून हसन मुश्रीफ स्वत: भाजपासोबत गेल्याचंही पवार म्हणाले.

Sharad Pawar On Hasan Mushrif
Sharad Pawar On Hasan Mushrif
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2023, 10:09 PM IST

Updated : Aug 25, 2023, 10:35 PM IST

शरद पवारांची कोल्हापुरात जाहीर सभा

कोल्हापूर : कोल्हापूरचा इतिहास शूरवीरांचा आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला असे वाटले की, एखाद्याला ईडीची नोटीस आली तर ते सामोरे जाण्याची ताकद दाखवतील. मात्र, चित्र वेगळंच असल्याचं सांगत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर निशाणा साधला.

मुश्रीफ ईडीला घाबरले : शरद पवार यांची शुक्रवारी कोल्हापुरातील दसरा चौकात सभा झाली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना, अजित पवार यांच्या गटात सामील झालेल्या मुश्रीफांवर देखील टीकास्त्र (Sharad Pawar criticizes Hasan Mushrif) सोडलं. केंद्र सरकारकडून विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक ईडीला घाबरले नाहीत, संजय राऊत घाबरले नाहीत, पण काही लोकांनी आपली भूमिका बदलली, असं पवार यांनी यावेळी सांगितलं.

नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा : भाजपाने सत्तेचा वापर करत राज्यातील अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लावला. यामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता. मात्र, ईडीच्या कारवाईदरम्यान त्यांच्या पत्नीनं धाडस दाखवलं. मात्र, कुटुंबप्रमुख असलेले मंत्री मुश्रीफ भाजपासोबत गेले, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी जाहीर सभेत केली.

मुश्रीफ भाजपासोबत : अनिल देशमुख आज आमच्यासोबत आहेत, पण, मंत्री मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी आमच्यावर गोळ्या झाडा, मात्र आमच्या मागे ईडीचा ससेमिरा नको, अशी भूमिका माध्यमांसमोरच मांडली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरातील सदस्यांनी ईडीचा सामना केला. मात्र, कारवाई टाळण्यासाठी मुश्रीफ भाजपासोबत गेले, असं शरद पवार म्हणाले.

भाजपाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही : देशातील महत्त्वाचं राज्य असलेल्या मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे. महिलांशी भेदभाव केला जातो. ज्यांच्याकडे सत्ता आहे, ते त्यांना वाचवू शकत नाहीत, अशी देशाची परिस्थिती आहे. आया, बहिणींची इज्जत वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देण्याचं आवाहन शरद पवार यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar : शरद पवारांच्या 'त्या' विधानावर अजित पवारांची दोन शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले...
  2. Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवारांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह? पवारांनी उत्तर द्यावे - संजय राऊत
  3. Mushrif On Pawar : पहिल्यांदाच माझ्या अनुपस्थितीत पवारांची कोल्हापुरात सभा; हसन मुश्रीफ झाले भावूक

Last Updated : Aug 25, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.