कोल्हापूर - गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शिरोळ तालुक्यात असणारे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात देखील पाणी शिरले आहे. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दत्त मंदिरात दुसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला आहे.
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर जागृत असून हे दत्तमंदिर कृष्णेच्या काठी वसलेले आहे. हा दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ९ जुलै रोजी यावर्षी पहिल्यांदा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर आता हा दुसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा झाला.