ETV Bharat / state

Satej Patil: चंद्रकांत खैरे यांनी कॉंग्रेसच्या आमदारांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे - सतेज पाटील - काँग्रेसचे 22 आमदार फुटणार

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केले होते. (Chandrakant Khaire statement about Congress MLA). यावर सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सतेज पाटील
सतेज पाटील
author img

By

Published : Nov 5, 2022, 5:44 PM IST

Updated : Nov 5, 2022, 6:21 PM IST

कोल्हापूर: शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केले होते. (Chandrakant Khaire statement about Congress MLA). यावर सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात असताना खैरे यांनी केलेले विधान हे संयुक्त नाही, चंद्रकांत खैरे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. शिवाय सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारणे हे चुकीचे असून बंदोबस्त आणि परवानगी नाकारायचा हा नवा ट्रेण्डच राज्यात सुरु झाला असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे. तसेच भारत जोडो यात्रेत कोल्हापूरचे कार्यकर्ते हिंगोलीत सहभागी होणार असून या यात्रेत कोल्हापुरी बाणा दाखवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

चंद्रकांत खैरे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे: जर सरकार पडले तर काँग्रेसचे 22 आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. याबाबत माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, चंद्रकांत खैरे यांनी अनेक वर्ष खासदार म्हणून काम केले असून ते शिवसेनेचे मोठे नेते आहेत. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात असताना खैरे यांचे हे विधान संयुक्तिक नाही. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे. सध्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत असून यामध्ये शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे सर्व सहभागी होत असतानाच असे वक्तव्य करून गैरसमज पसरवू नये असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली परवानगी नाकारायचा ट्रेंड: काल सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र हे अत्यंत चुकीचे असून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून सभेला परवानगी नाकारणे हे चुकीचे असून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली परवानगी नाकारायचा ट्रेंड सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यापुढे विनापरवानगी सभा सुरू होतील आणि यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून राज्यशासनाने राज्यातील प्रत्येक घटना व्यवस्थित होईल याची जबाबदारी घ्यावी असे ही ते म्हणाले आहेत.

कोल्हापूरी फेटा बांधून कार्यकर्ते होणार सहभागी: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही लवकरात महाराष्ट्रात दाखल होत आहे यावेळी काँग्रेस महाराष्ट्राच्या वतीने जोरदार तयारी सुरू असून कोल्हापूर मधून काँग्रेसचे 6 आमदार 12 तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते 12 तारखेला हिंगोली येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असून या यात्रेत कोल्हापुरी बाणा दाखवून देणार असल्याचे सतेज पाटील यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे या यात्रेत सर्व कार्यकर्ते कोल्हापुरी फेटा घालून चालणार असून देशामध्ये गेल्या सात वर्षात जे गडूळ वातावरण निर्माण झाला आहे ते दूर करण्यासाठी आणि राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सहभागी होत असल्याचे ते म्हणाले आहेत.

Last Updated : Nov 5, 2022, 6:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.