ETV Bharat / state

Abdul Sattar: सत्तार यांची वादग्रस्त विधाने यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत - संजय पवार - सत्तार यांची वादग्रस्त विधाने

गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्याकडून होत असलेली वादग्रस्त विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, गेल्या आठ दिवसात अब्दुल सत्तार जास्तच उर्मट बोलत आहेत आणि असेच सुरू राहिल्यास बाळासाहेबांवर प्रेम करणारी लोक याला उत्तर देतील असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे.(sanjay pawar)

विजय देवणे आणि संजय पवार
विजय देवणे आणि संजय पवार
author img

By

Published : Oct 28, 2022, 3:51 PM IST

कोल्हापूर: आम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रात मशाल मिरवणूक (mashal rally in maharashtra) काढणार आहोत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख विजय देवणे (vijay devne) आणि संजय पवार (sanjay pawar) यांनी दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. या मिरवणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ही सहभागी होणार असून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्याकडून होत असलेली वादग्रस्त विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, गेल्या आठ दिवसात अब्दुल सत्तार जास्तच उर्मट बोलत आहेत आणि असेच सुरू राहिल्यास बाळासाहेबांवर प्रेम करणारी लोक याला उत्तर देतील असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे.

विजय देवणे आणि संजय पवार

कोल्हापूर ते बेळगाव मशाल रॅली: एक नोव्हेंबर 1956 साली केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव, धारवाड, विजापूर व कारवार हे चार जिल्हे म्हैसूर प्रांतात समाविष्ट केले. यामुळे 1956 सालापासून एक नोव्हेंबर हा दिवस बेळगाव येथे काळा दिन म्हणून पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाकडून क्रांतीची मशाल मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक 31 ऑक्टोबरला कोल्हापूर पासून बेळगाव पर्यंत निघणार असून कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळापासून मशाल मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी म्हंटले आहे. ही मिरवणूक कागल मार्गे कोगनोळी, निपाणी, संकेश्वर हत्तर्गी मार्गे बेळगावला एक नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे. यावेळी या मिरवणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेही सहभागी होणार असल्याचे देवणे यांनी सांगितले आहे.

श्रीलंके सारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकते: शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे वारंवार वादग्रस्त विधान करणे हे काही आता नवीन राहिले नाही. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा छोटा पप्पू असे उल्लेख केला होता यानंतर आता ठाकरे गटाकडून अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करावं अन्यथा ते तुम्हालाच गोत्यात आणणार असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी म्हटले आहे. तसेच मंत्री पद टिकवण्यासाठी आणि दिल्लीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशी टीका करावी लागते, ते स्वतः बोलत नाहीत त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे आणि अशीच वक्तव्य सुरू राहिली तर याचा महाराष्ट्रात उद्रेक होईल असेही पवार म्हणाले आहेत. तसेच अब्दुल सत्तार यांच्याकडून असेच वक्तव्य होत राहिल्यास शिवसैनिकच नाही तर बाळासाहेबांवर प्रेम करणारी लोक याला उत्तर देतील. आज ना उद्या श्रीलंकेत जसं घडलं तसं महाराष्ट्रात घडायला वेळ लागणार नाही असे ही पवार म्हणेल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.