ETV Bharat / state

Govind Pansare Murder Case : कॉ. पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडचा दोषमुक्त करण्याचे अर्ज मागे - कॉम्रेड गोविंद पानसरे लेटेस्ट बातमी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ( Comrade Govind Pansare Murder Case ) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. ( Kolhapur District Session Court ) या हत्या प्रकरणातील तीन संशयित आरोपींनी दोषमुक्त करण्याची मागणी करणारा अर्ज आरोपींच्या वकिलांकडून जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आला होता. मात्र, आज आरोपीच्या वकिलांकडून त्यातील संशयित आरोपी समीर गायकवाडला दोषमुक्त करण्याचा अर्ज मागे घेण्यात आला आहे.

Co. Govind Pansare murder case
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
author img

By

Published : Mar 25, 2022, 7:37 PM IST

कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ( Comrade Govind Pansare Murder Case ) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. ( Kolhapur District Session Court ) या हत्या प्रकरणातील तीन संशयित आरोपींनी दोषमुक्त करण्याची मागणी करणारा अर्ज आरोपींच्या वकिलांकडून जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आला होता. मात्र, आज आरोपीच्या वकिलांकडून त्यातील संशयित आरोपी समीर गायकवाडला दोषमुक्त करण्याचा अर्ज मागे ( Sameer Gaikwad Plea Withdrawn ) घेण्यात आला आहे. तसेच डॉ. वीरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांच्यावर आज युक्तिवाद झाला.

सरकारी वकील हर्षद निंबाळकर याबाबत माध्यमांशी संवाद साधताना

डॉ. वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार - सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी हा युक्तिवाद करत असताना कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या जरी दोघांनी केली असले तरी हत्येसाठी वेगवेगळ्या संशयित आरोपींना वेगवेगळे काम देण्यात आले होते. मात्र, सर्वांचे लक्ष हे एकच होते. कॉम्रेड पानसरे यांना दोघांनी मारले असले तरी संशयित आरोपी विरेंद्र तावडे हा पानसरे हत्येच्या कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले आहे. तसेच वीरेंद्र तावडे याने सर्वांना काम वाटून देत असल्याचेही हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले असल्याचे म्हणाले आहेत. तर एसआयटीमार्फत तपास केलेल्या पुराव्यांचा हवाला दिला. वीरेंद्र तावडे यांच्या घरातून सापडलेल्या सनातन संस्थेविषयी माहिती वरून कॉम्रेड गोविंद पानसरे हे त्यांचे सर्वात मोठे विरोधक असल्याचे कसे सिद्ध होते हे न्यायालयात उलगडून सांगण्याचे त्यांनी प्रयत्न केले असल्याचेही म्हटले आहे. आज डॉ. वीरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांच्या विरोधात कोर्टात युक्तिवाद झाला. कोर्टाची वेळ संपल्याने आजची सुनावणी ही तहकूब करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार असल्याचे सरकारी वकील निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - Pravin Darekar : प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ; सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

समीर गायकवाडला दोषमुक्त करण्याचा अर्ज मागे - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 7 वर्ष उलटून गेले. मात्र, त्यांची हत्या कुणी केली याचा तपास आणखी लागलेला नाही. या तपासात कोणतेच धागे दोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या कालावधीत अनेक पोलीस अधिकारी कोल्हापुरात येऊन गेले. प्रत्येक वेळी तपासात हे ना ते कारण देत कॉम्रेड पानसरे यांना न्याय देण्यापासून वंचित ठेवले आहे. आता सध्या या केसमध्ये अनेक संशयितांना अटक करण्यात आलेले आहे आणि कोर्टात केस सुरू आहे. मात्र, तपास यंत्रणांकडे सबळ पुरावे नसल्याचे कारण देत संशयित त्याच्या वकिलांनी दोषमुक्त करण्याचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता.

मात्र, यापैकी संशयित आरोपी समीर गायकवाड याला दोषमुक्त करण्याचा अर्ज हा मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच डॉ. तावडे यांनी केलेले ईमेल संभाषण आणि साक्षीदार बरोबर केलेल्या संभाषणाचे कॉल डिटेल्स ही कोर्टासमोर सादर करण्यात आले. एकदा का सर्वांवर दोषारोप सिद्ध झाला की आणखीन पुरावे सादर करू असे सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.