ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या बांधावर झुणका भाकरी खात भरली 'जनपंचयात'; आवश्य पाहा - samarjit singh ghatge in panhala

मागील काही दिवसांपासून समरजितसिंह घाटगे 'शाहू जनक घराण्याची जनपंचयात' या शिवार संवादाच्या माध्यमातून जिल्ह्याचा दौरा करत आहेत. पन्हाळा-शाहूवाडी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावरच झुणका भाकरी खात घाटगे यांनी 'जनपंचयात' भरवली.

samarjitsingh ghatge news
शेतकऱ्यांच्या बांधावर झुणका भाकरी खात भरली 'जनपंचयात'; आवश्य पाहा
author img

By

Published : Nov 20, 2020, 12:44 PM IST

कोल्हापूर - मागील काही दिवसांपासून समरजितसिंह घाटगे 'शाहू जनक घराण्याची जनपंचयात' या शिवार संवादाच्या माध्यमातून जिल्ह्याचा दौरा करत आहेत. पन्हाळा-शाहूवाडी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावरच झुणका भाकरी खात घाटगे यांनी 'जनपंचयात' भरवली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या, व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. तसेच सर्व समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या बांधावर झुणका भाकरी खात भरली 'जनपंचयात'; आवश्य पाहा
शेतकऱ्यांना पाहून थांबवली गाडी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे 'शाहू जनक घराण्याची जनपंचयात' उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा दौरा करत आहेत. यावेळी पन्हाळा- शाहूवाडी दौऱ्यावर असताना येथील वाटेवरील शेतकऱ्यांना पाहून गाडी थांबवली. शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्यासोबत जेवण्याचा आग्रह केला. क्षणाचाही विलंब न करता समरजितसिंह घाटगे शेतकाऱ्यांसोबत जेवले.कर्जफेड केल्यानंतरही लाभ नाहीशेतकऱ्यांनी झुणका भाकरी खात आपल्या व्यथा समरजित घाटगे यांच्यासमोर मांडल्या. कर्जमाफी केल्यानंतरही लाभ मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाला सात महिने झाले असूनही त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही, असे ग्रामस्थ म्हणाले. आम्हाला सरकारपर्यंत जाता येतंय का? त्यामुळे तुम्हीच आमचे पैसे सरकारकडून मिळवून द्या, असं गऱ्हाणं शेतकऱ्यांनी मांडलं.15 हजारांसाठी दागिने गहाण

एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट ओढावले. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेती, घर सर्वकाही आहे. मात्र आलेल्या आर्थिक संकटातून आम्हा शेतकऱ्यांना मार्ग काढावा लागत आहे. 15 हजारांसाठी दागिने गहाण ठेवायला लागल्याचे एका महिलेने सांगितले. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुद्धा शासनाने मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

वाढीव लाईट बिलाचा भार

आम्हा शेतकऱ्यांवर नेहमीच विविध संकट येत असतात. त्यातच आता लाईटबिल सुद्धा वाढून आल्याने ते कसं भरायचं, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहमीपेक्षा दुप्पटीने बिलं आली आहेत. त्यासाठी सुद्धा शासनाने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता बिल भरावे लागेलच, असे म्हटले आहे. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न पडल्याचे शेतकरी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.