कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक चुकीच्या अफवांमुळे छोट्यामोठ्या सर्व पोल्ट्रीधारकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. याच अनुषंगाने आज भाजप जिल्हाध्यक्ष समरजितराजे घाटगेंनी जिल्ह्यातल्या विविध भागातील पोल्ट्री धारकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
यामध्ये त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना आणि सल्ले सुद्धा त्यांनी दिले. शिवाय भविष्यात उपयोगी पडतील असे महत्वाचे मुद्दे सुद्धा त्यांनी या कॉन्फरन्सिंगद्वारे मांडले. अचानक येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी, होणारे नुकसान टाळण्यासाठी पोल्ट्रीधारकांनी काय करावे याविषयावर मार्गदर्शन केले. सध्या पोल्ट्री व्यवसायाला स्थिरता लाभत असल्याचे समाधानही त्यांनी यावेळी व्यक्त केले.