'मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे सरकारला वाटतच नाही' - समरजितसिंह घाटगे न्यूज
कोल्हापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे सरकारला वाटतचे नसल्याचा आरोप केला आहे.

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आरक्षणावरील स्थगितीबाबत सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी झाली. त्यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. सुनावणीपूर्वी आमची पूर्ण तयारी झाली आहे असे सरकारकडून वारंवार सांगितलं गेले. मात्र सरकारने मराठा समाजाची कुठंतरी थट्टा केली आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटतचं नसल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे. काल बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणावरील स्थगितीबाबत सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरक्षणावरील स्थगित कायम ठेवली असून 25 तारखेला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत सरकारने न्यायालयात पुढची तारीख का मागितली? - संभाजी राजे