कोल्हापूर - एखाद्या माणसाला बदनाम करणे योग्य नाही. कोणत्याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांच्याबाबत काय झाले, हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे चौकशीआधी काहीही टीका करणे अयोग्य असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपला काहीही आरोप करायची सवय लागली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शिवाय यामध्ये राज्य सरकारमधील एका मंत्र्यांचा संबंध असल्याचा भाजपकडून आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे याबाबत चौकशीच्या आधी असे काहीही आरोप करणे चुकीचे असल्याचे मुश्रीफ म्हणाले. कोल्हापुरात एका आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
एखाद्या माणसाला बदनाम करणे योग्य नाही; चौकशी झाली पाहिजे - मुश्रीफ - हसन मुश्रीफ कोल्हापूर बातमी
कोणत्याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांच्याबाबत काय झाले, हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे चौकशीआधी काहीही टीका करणे अयोग्य असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपला काहीही आरोप करायची सवय लागली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
![एखाद्या माणसाला बदनाम करणे योग्य नाही; चौकशी झाली पाहिजे - मुश्रीफ कोल्हापूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10614485-526-10614485-1613223263864.jpg?imwidth=3840)