ETV Bharat / state

सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटलांची अवस्था मनोरुग्णासारखी - मुश्रीफ - hasan mushrif on chandrakant patil in kolhapur

भाजप सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांना दोन नंबरचे स्थान होते. शिवाय बांधकाम विभागासारखे महत्त्वाचे खाते सुद्धा होते. मात्र, त्यांनी त्याकाळात रस्त्यांची अक्षरशः वाट लावून टाकली. मला जर बांधकाम खाते मिळाले असते तर मी काचेचे रस्ते केले असते.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Nov 22, 2020, 4:27 PM IST

Updated : Nov 22, 2020, 5:14 PM IST

कोल्हापूर - राज्यातील सत्ता गेल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली असल्याची घणाघाती टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, अशी चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे, खुळ्यासारखे बडबडत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून ते असे करत असल्याचेही त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान ते कोल्हापुरात बोलत होते.

बोलताना मंत्री ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मला बांधकाम खाते मिळाले असते तर मी काचेचे रस्ते केले असते - मुश्रीफ
शरद पवारांवर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजप सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांना दोन नंबरचे स्थान होते. शिवाय बांधकाम विभागासारखे महत्त्वाचे खाते सुद्धा होते. मात्र, त्यांनी त्याकाळात रस्त्यांची अक्षरशः वाट लावून टाकली. मला जर बांधकाम खाते मिळाले असते तर मी काचेचे रस्ते केले असते.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटले होते
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात काल पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, अशी टीका केली होती. शिवाय आपण राजकारणात येण्यापूर्वी ते अभ्यासू नेते आहेत, असे समजायचो. मात्र, राजकारणात आल्यानंतर समजले की, ते अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांना मनोरुग्ण म्हटले आहे.

Last Updated : Nov 22, 2020, 5:14 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.