ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्यांना रविवारपासून आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक - कोल्हापुरात आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

कोल्हापुरातील वाढती कोरोनाबाधिताची संख्या विचारात घेता जिल्ह्यात रविवारपासून आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना मागील 48 तासातील आरटी-पीसीआर सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.

rtpcr-test-is-mandatory in kolhapur
rtpcr-test-is-mandatory in kolhapur
author img

By

Published : May 14, 2021, 3:19 PM IST

Updated : May 14, 2021, 3:27 PM IST

कोल्हापूर - शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. 'ब्रेक द चेन' अंतर्गत केवळ परवानगी असलेली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. इतर दुकाने सुरू झाल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत. तसेच दुकाने सील करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. तर जिल्ह्यात येणाऱ्यांना आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक बंधनकारक करण्यात आला आहे.

कोल्हापुरात आरटीपीसीआर बंधनकारक
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढलेले मृत्यूचे प्रमाण यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार 15 मेच्या मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याची नियमावली जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. या कालावधीत अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व उद्योग, व्यापारी, आस्थापने व सेवा पुरवणारे घटक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला, गॅस यांची घरपोच विक्री करण्यास परवानगी आहे. वैद्यकीय सुविधा, औषध दुकाने, वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक सर्व उत्पादन विक्री, वाहतूक वितरण व्यवस्था हे सुरू राहणार आहेत. तसेच शेतीशी निगडित मान्सूनपूर्व कामे सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी इंधन व पेट्रोलियम पदार्थ विक्री सुरू राहणार आहेत. अशी माहिती यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली.
जिल्ह्यात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक -
कोल्हापुरातील वाढती कोरोनाबाधिताची संख्या विचारात घेता जिल्ह्यात रविवारपासून आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना मागील 48 तासातील आरटी-पीसीआर सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली.
..तर थेट गुन्हे व दुकाने सील -
या लॉकडाउनच्या काळात केवळ परवानगी असलेली दुकाने आणि आस्थापने सुरू राहतील. इतर आस्थापने सुरू राहिल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा नोंद करण्याचे काम पोलीस प्रशासन करणार आहे. तसेच दुकानाचा परवाना काही कालावधीसाठी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.शैलेश बलकवडे यांनी दिले.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान -
शनिवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तालुका स्तरावर तसेच शहरातील सीमा भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी सहकार्य करून लॉकडाऊन पाळावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Last Updated : May 14, 2021, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.