ETV Bharat / state

जिल्हा परिषदेने केलेल्या मास्क खरेदीत गैरव्यवहार; माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा

author img

By

Published : Jul 8, 2020, 6:06 PM IST

Updated : Jul 8, 2020, 6:14 PM IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एन 95 मास्कची खरेदी केली. पण या खरेदीमध्ये मास्कच्या दारात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील अशाच पद्धतीने एन 95 मास्कची खरेदी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने 22 एप्रिलला खरेदी केलेल्या एन 95 मास्कची किंमत 180 रुपये इतकी आहे. तर याच सिरीलच्या 27 मेला खरेदी केलेल्या एन 95 मास्कची किंमत 66 रुपये इतकी दाखवण्यात आली आहे.

kolhapur
तफावत दाखवताना दिलीप देसाई

कोल्हापूर - संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद, मनपामध्ये मास्क खरेदी झाली आहे. त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये एकाच सिरीयल नंबरचा मास्क वेगवेगळ्या दराने खरेदी होत असल्याची माहितीही देसाई यांनी माहिती अधिकारातून समोर आणली आहे.

जिल्हा परिषदेने केलेल्या मास्क खरेदीत गैरव्यवहार; माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एन 95 मास्कची खरेदी केली. पण या खरेदीमध्ये मास्कच्या दारात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील अशाच पद्धतीने एन 95 मास्कची खरेदी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 22 एप्रिलला खरेदी केलेल्या एन 95 मास्कची किंमत 180 रुपये इतकी आहे. तर याच सिरीलच्या 27 मेला खरेदी केलेल्या एन 95 मास्कची किंमत 66 रुपये इतकी दाखवण्यात आली आहे. आणखी एका महिन्याच्या मास्क खरेदीमध्ये 190 रुपये दराने खरेदी केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दोन वेगवेगळ्या दरात एन ९५ मास्क खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २७ मे रोजी विभागाने एका खासगी एजन्सीकडून ६६ रुपये प्रति नग अशा दराने १० लाख मास्कची खरेदी केली. तर तेच मास्क एप्रिल महिन्यात १९० रूपये दराने खरेदी करण्यात आले आहेत. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी उघडकीस आणली आहे. होलसेल विक्रेत्यांनी १० टक्के व रिटेल विक्रेत्यांनी १८ टक्केपर्यंत कमिशन घेणे बंधनकारक आहे. जो मास्क बाजारात 110 रुपये पर्यत मिळतो, तो मास्क कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १९० रुपये दराने खरेदी केला आहे. त्यामुळे इतक्या ज्यादा दराने मास्क खरेदी का केली ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. हा प्रकार फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नसून पूर्ण राज्यात मास्कचे दर वेगवेगळे लावण्यात आले आहेत. याची चौकशी कॅगमार्फत झाली पाहिजे, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

Last Updated : Jul 8, 2020, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.