ETV Bharat / state

Shiva Jayanti Celebrations : पारंपरिक पद्धतीने कोल्हापूरात पार पडला शाही शिवजयंती सोहळा - शिवाजी महाराजांचे मंदिर

देशभरात आज शिवजयंती (Shiva Jayanti Celebrations ) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोल्हापुरात टाऊन हॉल परिसरात असलेल्या नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात (Temple of Shivaji Maharaj) छत्रपती घरण्यामार्फत शिवजयंती शाही पद्धतीने साजरी होत असते. यावर्षी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती (Maloji Raje Chhatrapati) यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने ही शिवजयंती साजरी झाली. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी याठिकाणी येऊन शिवरायांचे दर्शन घेतले.

शाही शिवजयंती सोहळा
author img

By

Published : Feb 19, 2022, 7:05 PM IST

कोल्हापूर: कोल्हापुरातील नर्सरी बाग येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी शिवरायांचे (Temple of Shivaji Maharaj) मंदिर बांधले. कोल्हापुरातील टाऊन हॉल शेजारीच असलेल्या या नर्सरी बागेत हे अत्यंत देखणे मंदिर बांधले आहे. काळ्या दगडात बांधकाम केलेले हे मंदिर दुमजली आहे. संस्थान काळापासून या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी (Shiva Jayanti Celebrations ) केली जाते. आज शाही लावजम्यासह येथील भवानी मंडप मधून शिवरायांची पालखी निघाली. छत्रपती घराण्यातील सदस्य पारंपारिक पेहरावासह नर्सरी बाग येथे पोहोचले. दरवर्षी प्रमाणे नर्सरी बागेत मोठा मंडप घालून एक शामियाना बनविण्यात आला होता. याठिकाणी पोवाडे तसेच इतर कार्यक्रम पार पडले. आजही ही परंपरा छत्रपती घराण्याने अखंडितपणे सुरू ठेवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.