कोल्हापूर - 'शिवाजी विद्यापीठ' आणि ज्या-ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे, ते दुरुस्त करण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. या आशयाचे एक पत्र संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मराठा आरक्षण मागणी आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
-
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) बाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. pic.twitter.com/4N0ClxDFwg
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) बाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. pic.twitter.com/4N0ClxDFwg
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2019मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) बाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. pic.twitter.com/4N0ClxDFwg
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2019
कोल्हापूर विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे म्हटले जाते. हा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. त्यामुळे 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे विद्यापीठाचे नामकरण करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली.
हेही वाचा - झूम प्रकल्प प्रकरणी मनपावर कारवाई करा अन्यथा.., शिवसेनेचा इशारा
मागील काही दिवसांपासून शिवाजी महाराजांच्या नामोच्चारावरून अनेक चर्चा होत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन प्रकरण आणि केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद हे अलीकडील काळात घडलेली उदाहरणे आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नामविस्ताराचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.