मुंबई - सरसेनापती साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांना अटकपूर्व जामीन मिळतोय का याबाबतची सुनावणी आज मुंबई सत्र न्यायालयात झाली. त्यात आणखी अंतिम संरक्षणात वाढ मिळाली आहे. मात्र सुनावणी तहकूब केली गेली. पुढील सुनावणी 6 एप्रिल रोजी होईल.
सरसेनापती साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या तिन्ही मुलांना अटकपूर्व जामीन मिळतोय का याबाबतची आज सुनावणे मुंबई सत्र न्यायालयात होणार होती. हसन मुश्रीफ यांच्याबाबत अंमलबजावणी संचलनालयाने कथित कंपनीमध्ये आणि बँकेमध्ये पैशाचा गैरव्यवहार करण्यात आला असा आरोप ठेवला गेला.
परिस्थितीजन्य आणि इतर पुरावे - यासंदर्भात हा गंभीर आरोप असल्यामुळे विविध प्रकारची कलमे लावून त्यांना अटक करणे जरुरी आहे. त्या अटकेसाठी तपास यंत्रणांच्याडे सादर करण्याजोगे काही परिस्थितीजन्य आणि इतर पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळेच हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन रद्द होऊ नये; असे इडीच्या वकिलांचे आधीच्या सुनावणीमध्ये म्हणणे होते. आत्यासाठी त्यांनी त्या दिवशी वेळ मागून घेतला होता. मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी वेळ आता संपला असल्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये नक्कीच आपण त्याबाबत सुनावणी करू असे म्हटले होते.
न्यायालयाने याबाबतची घेतली गंभीरपणे दखल - त्यानंतर पुढील सुनावणी वेळी अंमलबजावणी संचलनालयाने काही तथ्य आणि पुरावे सत्र न्यायाधीशांच्या समोर मांडले होते. हसन मुश्री यांनी 200 लोकांचा जमाव आणत मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती. त्याबाबतचे फुटेज देखील ईडीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सादर केले गेले होते. पी एम एल ए न्यायालयाने याबाबतची गंभीरपणे दखल देखील घेतली होती.
साजिद, नाबीद आणि आबिद यांच्या जामीन अर्जावर सुनावणी - मुश्रीफ यांच्या वकिलांनी याबाबत वस्तुस्थिती तशी नसल्याचे दाव्यात मांडले होते. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ त्यांचे तिन्ही मुले तसेच कथीत ऑडिटर महेश गुरव या सर्वांच्या संदर्भात मागील आठवड्यामध्ये सुनावणी झाली. आज त्यांच्या अर्थात साजिद, नाबीद आणि आबिद यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. त्यांना अटकपूर्व जामीन न्यायालय मंजूर करते का याकडे राजकीय क्षेत्रातल्या मंडळींचा लक्ष लागले होते. आज पुन्हा अटकेपासून संरक्षण देऊन ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
उल्लेखनिय बाब म्हणजे आजच हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात पुण्यामध्ये काही ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आधीच वर्तवली जात आहे. मात्र आजच्या या जामीन अर्जावर कोर्ट काय निर्णय घेते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.