ETV Bharat / state

'दिल्लीमध्ये सुरू असलेले आंदोलन दलालांचे' - कोल्हापूर जिल्हा बातमी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या मंगळवारच्या (दि. 22 डिसें.) मुंबईतील मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका केली आहे. कोण कशा पद्धतीने आंदोलन करत हा ज्याचा त्याचा भाग आहे. मात्र, रोग हल्याला आणि इंजेक्शन पकालीला अशा पद्धतीने लोक करतात, अशी टीका राजू शेट्टी यांचे नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
author img

By

Published : Dec 21, 2020, 7:44 PM IST

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या पायतील बेड्या काढा, अशी वर्षानुवर्षे मागणी होत होती. ती मागणी मान्य होत असेल आणि आता स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असेल तर आम्ही त्याचे स्वागत का करू नये? आता जे आंदोलन सुरू आहे हे काय देशभराचे आंदोलन नाही. हे केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील केवळ दलालांचे आंदोलन आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली.

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रयत क्रांती संघटना आणि भाजपच्या माध्यमातून 'किसान आत्मनिर्भर यात्रेचे' आयोजन करण्यात आले आहे. याबाबतच माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंदोलन करत असलेले दलाल काँग्रेस अन् डाव्या विचारसरणीचे

दिल्लीमध्ये आंदोलनास बसलेले सर्व दलाल हे काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे आहेत. ज्यांना या देशांमध्ये काहीही नवनिर्मिती होत असेल तर ते नको असून त्याला केवळ विरोधच करायचा, अशी ही मंडळी आहे. खुली अर्थव्यवस्था आली तेव्हाही हे विरोध करत होते. मात्र, आम्ही पुढे येऊन त्याचे समर्थन केले होते. पण, चांगल काही होत असेल तर नेहमी त्यांना विरोधच करायचा असतो अशी ही मंडळी असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

रोग हल्याला आणि इंजेक्शन पखालीला

अदानी-अंबानी शेतकऱ्यांना लुटायला कधीपासून आलेत याचा शोध घ्यावा लागेल. एखाद्या उद्योगपतीची कंपनी आपल्या भागात येणार असेल तर अनेक नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल म्हणून आपण पायघड्या घालतो. मात्र, शेतीमध्ये जर गुंतवणूक करणार असेल तर त्याला मात्र आम्ही विरोध करतो हा विरोधाभास आहे, असे म्हणत शेट्टींच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनावर सदभाऊंनी टीका केली. शिवाय कोण कशा पद्धतीने आंदोलन करते हे ज्याचा त्याचा भाग आहे. मात्र, जो कोणी चांगला भाव देत असेल त्याच्याकडे आम्ही माल विकू. पण 'रोग हल्याला आणि इंजेक्शन पखालीला' अशी ही परिस्थिती झाली असल्याची उपहासात्मक टीका सुद्धा खोत यांनी केली.

हेही वाचा - कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : 81 प्रभागांचे आरक्षण जाहीर; पाहा कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण

हेही वाचा - 'पोपटाची मान पिरगाळल्याशिवाय राक्षस मरणार नाही..' 'स्वाभिमानी'चा अदानी-अंबानींच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.