कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज उपोषण सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर विशाल चौगुले हे कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणास बसले आहेत. दोन दिवस उलटले तरीही जिल्हा बँकेच्या प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही. आज स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह उपोषण स्थळी भेट देऊन प्रशासनाला जाब विचारला. यावेळी राजू शेट्टी यांनी काय राजकारण करायचे ते करा, गौतमी पाटीलला आणून जरी नाचवली तरी आमची हरकत नाही, अशा संतप्त भावना यावेळी राजू शेट्टी व्यक्त केली.
आमरण उपोषण सुरू : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर मधील अकिवट गावचे माजी सरपंच विशाल चौगुले कार्यकर्त्यांसह जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. अकिवाट येथील नियोजित विमलनाथ चौगुले विकास सेवा सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. या सोसायटीला आवश्यक कर्ज पुरवठा करत असल्याचा, तसेच जिल्हा बँक तिचा दाखला गेल्या चार महिन्यांपासून मागणी करूनही चौगुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना मिळालेला नाही. शिरोळ तालुक्यातील आमदार असलेल्या संचालकांने अडकाटी घातल्याचा आरोप करत माझी सरपंच विशाल चौगुले यांच्यासह कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट : चौगुले यांच्यासह संचालक म्हणाले की, चार महिने हेलपाटे घालूनही दाखला मिळाला नाही. मात्र संचालक असलेल्या आमदाराच्या निकटवर्तींना जिल्हा बँकेने संचालकांच्या सांगण्यावरून कर्ज पुरवठा करत असल्याचा आरोप यावेळी चौगुले यांनी केला आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी माने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत याबाबत जाब विचारला.
हेही वाचा -