ETV Bharat / state

राजू शेट्टी यांनी शेतात 107 आंब्याची रोपे लावून साजरा केला 'कृषीदिन'

कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलैला कृषी दिन साजरा करण्यात येतो. यंदा वसंतराव नाईक यांची 107 वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतामध्ये 107 आंब्यांची रोपे लावून आजचा दिवस साजरा केला.

raju shetty in kolhapur
राजू शेट्टी यांनी शेतात 107 आंब्याची रोपे लावून साजरा केला 'कृषीदिन'
author img

By

Published : Jul 1, 2020, 8:08 PM IST

कोल्हापूर - कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलैला कृषी दिन साजरा करण्यात येतो. यंदा वसंतराव नाईक यांची 107 वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतामध्ये 107 आंब्यांची रोपे लावून आजचा दिवस साजरा केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतामध्ये 107 आंब्यांची रोपे लावून आजचा दिवस साजरा केला.

हरितक्रांतीचे जनक, राज्याचे 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांची आज 107 वी जयंती असून त्यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनीय काम केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले.

raju shetty in kolhapur
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतामध्ये 107 आंब्यांची रोपे लावून आजचा दिवस साजरा केला.

संकरीत वाणाच्या गाई, म्हशींची पैदास करून वसंतराव नाईक यांनी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या. एव्हढेच नाही, तर दूध डेअरींच्या मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुद्धा त्यांनी उभारून दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले. नाईक यांनी आपल्या कार्यकाळात कापूस एकाधिकार योजना राबवून कापूस खरेदीतील दलाली बंद केली.

यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अधिकाधिक पैसा कसा जाण्यासाठी प्रयत्न झाले. चिकू, द्राक्षे, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळ पिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केले. त्यांनी आपल्या 1952 ते 1979 या सत्ताविस वर्षांच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्याचे शेट्टींनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.