ETV Bharat / state

राजू शेट्टींचे कोल्हापुरात शक्तिप्रदर्शन, बैलगाडीतून मिरवणूक काढून भरला उमेदवारी अर्ज

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राजू शेट्टींनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राजू शेट्टींनी भरला उमेदवारी अर्ज
author img

By

Published : Mar 28, 2019, 6:18 PM IST

Updated : Mar 29, 2019, 6:02 AM IST

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे.

या भव्य रॅलीत राजू शेट्टींसोबत किसान संघटनेचे नेते योगेंद्र यादव, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून आपला अर्ज भरला.

यावेळी रॅलीमध्ये झालेली लोकांची गर्दी पाहून योगेंद्र यादव म्हणाले, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी झगडणारे नेते आहेत. मागच्या वेळी ते दीड लाख मतांनी निवडून आले होते. तर आता ते ३ लाख मतांनी निवडून येतील. शेट्टींचा विजय म्हणजे देशातील प्रत्येक शेतकऱ्याचे कल्याण होणार आहे. शेट्टी शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये आवाज उठवतील आणि मग शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी हे एकत्र जमले. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात केली. दसरा चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि युवक सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी युती सरकारवर टीका करत आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या ५ वर्षांमध्ये १ कोटी ५२ लाख ६० हजार रुपयांची वाढ झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा उमेदवारी अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरला. त्यांनी सादर केलेल्या विवरणपत्रामध्ये ही माहिती सादर केली आहे. २०१४ सली शेट्टी यांची एकूण ८४ लाख इतकी मालमत्ता होती. ती आता २ कोटी ३६ लाख इतकी झाली असून त्यांच्या मालमत्तेत एकूण दीड कोटींहून अधिक वाढ झाली आहे. टक्केवारीचा विचार करता ही तिप्पट वाढ आहे.

Intro:अँकर- करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून काँग्रेस - राष्ट्रवादी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय. भव्य रॅलीत राजू शेट्टीसोबत सोबत किसान संघटनेचे नेते योगेंद्र यादव, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढुन आपला अर्ज भरला.Body:व्हीओ-1 : खासदार राजू शेट्टी यांनी आजच्या रॅलीमधून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीमध्ये किसान सभेचे दिल्लीचे नेते योगेंद्र यादव हेही सहभागी झाले होते. रॅलीमध्ये झालेली लोकांची गर्दी पाहून ते म्हणाले, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी झगडणारे नेते आहेत. गेल्या वेळी दीड लाख मतांनी निवडून आले होते आता तीन लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास यावेळी यादव यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, शेट्टींचा विजय म्हणजे देशातील प्रत्येक शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे. शेट्टी शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये आवाज उठवतील आणि मग शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Play 1 to 1 राजू शेट्टी, योगेंद्र यादव

व्हीओ-2 : कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी हे एकत्र जमले त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात केली. दसरा चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि युवक सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी युती सरकारवर टीका करत आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

बाईट- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी)
बाईट- हसन मुश्रीफ (आमदार)

व्हीओ-3 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांमध्ये एक कोटी ५२ लाख ६० हजार रुपयांची वाढ झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा उमेदवारी अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरला. त्यांनी सादर केलेल्या विवरणपत्रमध्ये ही माहिती सादर केली आहे. २०१४ सली शेट्टी यांची एकूण ८४ लाख इतकी मालमत्ता होती. ती आता दोन कोटी ३६ लाख इतकी झाली असून त्यांच्या मालमत्तेत एकूण दीड कोटींहून अधिक वाढ झाली असून टक्केवारीचा विचार करता ही तिप्पट वाढ आहे.Conclusion:.
Last Updated : Mar 29, 2019, 6:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.